जवळा येथे भाजपा स्थापना दिवस साजरा

*जवळा येथे भाजपा स्थापना दिवस साजरा*
आर्णी. तालुक्यातील जवळा येथे श्री विठ्ठल मंदिर येथे पूजन करून भाजपा स्थापना दिनाचे औचित्य साधून जवळा येथे प्रचाराला सुरुवात करण्यात आली. तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे व शिवसेना शिंदे गटाचे तसेच अजित पवार गटाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आर्णी तालुका प्रमुख राजेंद्र जाधव यांनी मार्गदर्शन करताना सर्व शिंदे गटाचे पदाधिकारी तन, मन,धनाने भाजपा चे काम करतील व प्रचंड बहुमताने आर्णी चंद्रपूर चे उमेदवार सुधीर मुनगंटीवार निवडून येथील असे आश्वासन दिले तसेच डॉ. सेलचे अध्यक्ष डॉ.रमेश व्यवहारे यांनी भारतीय जनता पार्टी च्या सरकार मध्ये झालेल्या विकास कामाची माहिती दिली व यावेळी जनतेनी "अबकी बार 400 पार" हा नारा लावीत आर्णी चंद्रपूर मतदार संघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना निवडून द्यावे असे आवाहन केले तसेच आर्णी भाजपचे तालुका अध्यक्ष किसन राठोड यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन अविनाश पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रवींद्र राठोड यांनी केले या कार्यक्रमाला आर्णी शहर अध्यक्ष विशाल देशमुख,माधव राठोड,बाबाराव खोडणकर,नंदू देशमुख,दिलीप नागापुरे,विलास आडे,अबू मिस्त्री,भाऊसाहेब अत्रे,सुरेश चव्हाण,रामराव जाधव,दादाराव शेगर,संतोष जाधव,गणेश आडे,संजय नागपुरे,तुळशीराम कोटमकर,गणेश धनोडे,रुपेश आडे, वर्षा जाधव,वनिता इंद्रवार,वैशाली बावणे,अविना राठोड, अरुणा वाठोरे,अनुसया नेमाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...