तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पेरणा घ्यावी*- परमेश्वर कदम यांचे प्रतिपादन

*तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पेरणा घ्यावी*- परमेश्वर कदम यांचे प्रतिपादन.
*आर्णी येथे तिथी नुसार शिवजयंती साजरी* काल दि. ३० मार्च रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला यावेळी प्रमुख व्याख्याते श्री परमेश्वर कदम पाटील ( परभणी ) यांचे स्वागत डॉ श्री सत्तुरवार सर यांनी केले तर प्रमुख पाहुणे वेदमूर्ती श्री केदार गुरुजी यांचे स्वागत डॉ श्री घुटे सर यांनी केले. शिवजयंती चे औचित्य साधून आर्णी शहरातील देव देश धर्मासाठी योगदान देणाऱ्या तिघांचा प्रमुख पाहुण्यांचे हस्ते शाल श्रीफळ आणि श्रीरामाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
यात हिंदू स्मशानभूमीची १३ वर्षांपासून सेवा करणारे राजू मादेशवार,हिंदुत्वासाठी नेहमी तत्पर असणारे सुनील मामा ठाकूर, आणि पत्रकारितेचा माध्यमातून नेहमी देव, देश, धर्मासाठी कार्यरत असणारे गणेश भाऊ धणोडे या तिघांचा कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर दुर्गा वाहिनीची ९ मुलींना लव जिहाद एक षडयंत्र हे पुस्तक प्रमुखांच्या हस्ते भेट देण्यात आले. त्या नंतर प्रमुख व्याख्याते आणि प्रमुख पाहुणे यांचे व्याख्यान पार पडले यादरम्यान व्याख्याते परमेश्वर कदम पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहास सांगितला आपल्या राज्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरित्र वाचावे व घराघरात हरिपाठाची पुस्थिका ठेवावी असे प्रतिपादन केले. आजचे तुरून हे व्यसनात जात आहे त्यांनी व्यसन न करता जो व्यवसाय करता येईल त्या कडे जास्त लक्ष द्यावे किंव्हा आपल्या वडिलोपार्जित शेती व्यवसायात लक्ष द्यावे भविष्यात शेतकरी देशात सर्वात मोठा उद्योगपती होईल असेही त्यांनी सांगितले.कार्यक्रम सुरू असताना पावसाचे वातावरण झाले होते तरी सुद्धा सगळे बांधव वेळात वेळ काढून कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले त्या बद्दल श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आर्णी विभागाकडून सर्वांचे मनापासून कौतुक यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे धारकरी शिवम ढोले पाटील यांनी केले.
*माझ्या जीवनातील सर्वात मोठा पुरस्कार* गणेश धनोडे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आर्णी विभाग यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा केला यात विविध शेत्रात काम करणारे हिंदू बांधव यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आर्णी तालुक्यातून 3 व्यक्ती पैकी 1 सन्मान त्यांनी मला दिला त्यासाठी मी सदैव श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आर्णी विभाग यांचा आभारी राहीन व अधिक जोमाने देव, देश, धर्माच्या कार्यात सदैव तत्पर राहीन हा सन्मान माझ्या जीवनातील सर्वात मोठा पुरस्कार आहे असे मी मानतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...