दोन पुतणींसह काकूचा नदीपात्रात बुडून मृत्यू

दोन पुतणींसह काकूचा नदीपात्रात बुडून मृत्यू
भगीरथ राजा २४ न्यूजआर्णी पैनगंगा नदी पात्रात बेलफूल वाहण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्या पुतणींसह काकूचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि. १३ एप्रिलला सायंकाळी कवठा बाजार येथे घडली. प्रतिक्षा प्रविण चौधरी वय ३५, अक्षरा निलेश चौधरी वय ११, आराध्या निलेश चौधरी वय ९ रा. कवठा बाजार ता. आर्णी अशी मृतकांची नावे आहे.
आर्णी तालुक्यातील कवठा बाजार येथील प्रतिक्षा चौधरी, जया चौधरी, रेणू चौधरी, अक्षरा चौधरी, आराध्या चौधरी या शनिवारी गावालगत असलेल्या पैनगंगा नदी पात्रात बेलफूल वाहण्यासाठी गेल्या होत्या. नदी पात्रात रेती उपसा केल्याने खड्डेच खड्डे पडले आहेत. नदीला पाणी असल्याने रेती उपसा झालेल्या खड्डयात पाणी साचून असल्याचे लक्षात न आल्याने त्यात काकू प्रतिक्षा चौधरी, पुतणी अक्षरा चौधरी आणि आराध्या चौधरी या पडल्या. दरम्यान, मुलींची आई जया निलेश चौधरी व मोठी बहीण रेणू चौधरी यांनी त्या तिघींना पाण्यातून बुडताना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या तिघींना वाचवू शकल्या नाहीत. तिघीही पाण्यात बुडून मरण पावल्याची माहिती गावात परसल्याने नातेवाईकासह कवठा ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.. बाजार

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...