*जवळा येथे आर्णी पोलिसांच्या वतीने रुटमार्च*
*शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्याचे ठाणेदार केशव ठाकरे यांचे आवाहन*
आर्णी.
आगामी होऊ घातलेल्या सन उत्सव व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्यावतीने शनिवार दि. 13 तारखेला रूटमार्च काढण्यात आला. या रूटमार्चचे संचालन आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे यांनी केले. यावेळी आऊटपोस्ट पोलिस चौकीचे जमादार अरुण चव्हाण व पोलीस जवानांची तुकडी आर्णी पो. स्टे.मधील जवळा आऊट पोस्ट पोलिस चौकीचे कर्मचारी या रूटमार्चमध्ये सहभागी झाले होते. हा रूटमार्च बसस्थानक चौकातून गावातील प्रमुख मार्गानी काढण्यात आला.
शेवटी जवळा पोलीस चौकीत आर्णी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांनी सर्व शांतता समिती सदस्य व राजकीय पक्षाच्या नेत्यांना आगामी होऊ घातलेल्या सन उत्सव व निवडणूक शांततेत पार पाडावी असे आवाहन केले.
जवळा येथे आर्णी पोलिसांच्या वतीने रुटमार्च
Bhagirath Raja 24 News.com
0


टिप्पणी पोस्ट करा