*भव्य मोफत रोग व डोळे निदान मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर*
आर्णी :
दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती यवतमाळ ,बळीराजा चेतना अभियान व म.रा.मराठी पत्रकार संघ अंतर्गत श्री सत्य साई समिती यवतमाळ द्वारे तालुका आरोग्य अधिकारी , ग्रामीण रुग्णालय आर्णी व ग्राम पंचायत कार्यालय लोणबेहळ यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते चंदन राठोड व चंद्रकांत बंडे यांनी भव्य मोफत रोग व डोळे निदान मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरचे 30 एप्रिल रोज मंगळवरला सकाळी १० ते २ वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र लोणबेहळ या ठिकाणी आयोजित केले आहे.
दृष्टी असूनही केवळ पैशाच्या अभावामुळे अठरा विश्व दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या हजारो गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, अबालवृद्ध रुग्णासाठी सामाजिक बांधिलकीची आवड असणाऱ्या शेतकरी पुत्र सामाजिक कार्यकर्ते चंदन राठोड यांनी उजेडाचा सूर्य आणला आहे. गेल्या १८ वर्षा पासून कोणतेही राजकीय पाठबळ नसून केवळ इच्छाशक्ती व सर्वांच्या सहकार्याने दिव्य संकल्पनेतून साकारलेल्या अभिनव उपक्रमाने आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या सेवेचा उदात्त वसा घेतलेला आहे.या शिबिराचे उद्घाटन डॉ.सुनील भवरे, प्रल्हादराव इंगळे, भिकमचंद लोया, प्रल्हाद काटकर व राजू इंगोले यांच्या हस्ते डॉ.कृष्णा राठोड, हरिओम बघेल,नालंदा भरणे, श्रीराम राऊत,सुनील चोरडिया विजयराव बुटले यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.शिबिराच्या अध्यक्षस्थानी चंदनलाल जयस्वाल हे राहणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार वैशाख वाहुरवाघ, ठाणेदार केशव ठाकरे, सुधाकर पंडे, डॉ.आरती नाटकर, रामकृष्ण राऊत, भुजंगराव जोगदंड, विकास मुळे, विलास जाधव, तुकाराम राऊत, भुजंगराव अचमवार, प्रकाश बुटले, डॉ.पवन जाधव, डॉ.प्रतिक वाघमोडे, डॉ.समृध्दी राठोड यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. या शिबिरा दरम्यान जनरल फिजीसियन तज्ञ डॉ. अरुण वाघ रूग्णांची तपासणी करणार असून दंतरोग तज्ञ डॉ. दाक्षायणी हिवराळे ह्या दातांच्या तपासणी करणार तर डॉ. अविनाश बेलंगे, डॉ. स्वप्नील तायडे हे डोळे व मोतीबिंदू रुग्णांची तपासणी करणार असून यावेळी टेक्निशियन गुलाब राठोड हे रक्त गट तपासणी करणार आहे
या वेळी रूग्णांची तपासणी करून श्री सत्य साई समिती वाघापूर यवतमाळ यांच्या वतीने निशुल्क औषधी देण्यात येणार आहे दरम्यान गजानन ऑप्टिकल यवतमाळ यांच्या कडून रुग्णांना अल्प दरात चष्मे देण्यात येणार आहे असून मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची निवड करण्यात येणार आहे. यावेळी शिबिरातील निवड झालेल्या मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची यवतमाळ येथील आयुर्वेदिक रुग्णालयात नेत्र तज्ञ डॉ.मनोज तगडपलीवार, डॉ.प्रशांत चव्हाण, डॉ. स्मिता चव्हाण हे रुग्णावर शस्त्रक्रिया करतील.या शिबिराच्या कार्यक्रमाचे समारोप राजेंद्र डांगे,अरविंद तायडे, डॉ. षडज चव्हाण, श्रीकांत राऊत यांच्या उपस्थितीत असून या शिबिराच्यादरम्यान बळीराजा चेतना अभियानांतर्गत शेतकऱ्यांना शेती विषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तरी ग्रामीण भागातील गोर गरीब अबाल वृद्धानी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी ,ग्रामपंचायत कार्यालय लोणबेहळ यांच्या वतीने शिबिराचे आयोजक चंदन राठोड व चंद्रकांत बंडे यांनी केले आहे.
भव्य मोफत रोग व डोळे निदान मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा