ऊमरी पठार वृध्दाश्रमात महाराष्ट्र दिन साजरा— कामगारांच्या बलीदानातुन महाराष्ट्र राज्याची निर्मिती—शेषरावजी डोंगरे

ऊमरी पठार वृध्दाश्रमात महाराष्ट्र दिन साजरा— कामगारांच्या बलीदानातुन महाराष्ट्र राज्याची निर्मिती—शेषरावजी डोंगरे
******************* जवळा ऊमरी पठार वृध्दाश्रमात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.या दिनाचे महत्व कामगार दिवस म्हणूनही आहे.वृध्दाश्रमात आलेले वृध्द बहूतांश मजुर कामगार असतात.आर्थिक ऊपेक्षा त्यांच्या वाट्याला आलेली असल्यामुळे दारिद्र्याच्यृ छळातुन आयूष्याच्या शेवटी वृध्दापकाळात त्यांचेवर वृध्दाश्रमात येण्याची पाळी येते.तसे पाहीले तर राष्ट्राला पोसणारी ही खरी माणसं आहेत.मुंबईच्या गिरणी कामगारांनीच हुतात्म्य पत्करुन महाराष्ट्राची निर्मिती केली.त्यावेळी कामगार चळवळीत अण्णाभाउ साठे,एस.एम.जोशी,डांगे, शाहीर अमर शेख आदिंनी हीरारीने भाग घेतला होता.यशवंतराव चव्हाण यांनी देखील महाराष्ट्र निर्मीतीची भूमिका देशपातळीवर मांडली होती अशी सविस्तर माहीती वृध्दाश्रमाचे संस्थापक मा.शेषरावजी डोंगरे यांनी या प्रसंगीचे आपल्या भाषणातुन व्यक्त केली.सुरवातीला वृध्दाश्रमाचे सेवक मनोज लंके यांचे हस्ते झेंडावंदन करुन मानवंदना देण्यात आली.कार्यवाह जयप्रकाश डोंगरे यांनी शेवटी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...