वारनवार खंडीत होणारा विज पुरवठा सुरळीत करा.....परवेज बेग यांचे निवेदन*

*वारनवार खंडीत होणारा विज पुरवठा सुरळीत करा.....परवेज बेग यांचे निवेदन*
------------------------------------- आर्णी ता,29 मे....आर्णी शहरासह तालूक्यात वारमवार विज पूरवठा खंडीत होत असल्याने आर्णिकरासह तालूक्यातील नागरिक संपप्त झाले आहे,वारमवार खंडीत होणारा विज पूरवठा सूरळीत करण्याचे निवेदन ता,27 मे रोजी परवेज बेग यांनी उपकार्यकारी अभियंता राजेद्र राऊत यांना देवून मागणी केली आहे,
भर उन्हाळ्यात आर्णी परिसरातील विद्यूत पुरवठाच्या ढिसाळ नियोजनामुळे परिस्तिथितील समस्या नागरिकांना नाहक त्रासाला समोर जावे लागत आहे. उष्माघाताचा तडाख्यात जीवाची लाही-लाही होत आहे मात्र त्यातच विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्याने जीवाशी खेळण्याच्या प्रकार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आर्णीच्या ढिसाळ नियोजनाने होत आहे. लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध, रुग्ण यांना जिवंतपणी नरकयातना भोगाव्या लागत आहे. विद्युत पुरवठ्या अभावी कार्यालयातील कामे रखडली आहे. परिणामे ग्रामीण भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कित्येकांना नाइलाजस्तव उन्हाच्या तडाख्यात बाहेर पडून झाडाच्या आडोशाला विसावा घ्यावा लागत आहे, अशाम्रागणीचे निवेदन उपकार्यकारी अभियंता राजेद्र राऊत यांना सामाजिक कार्यकर्ते परवेज बेग यांनी दिले यावेळी फारुख धारीवाला, शकील शेख, आमीन सय्यद, साबीर शेख, रोहित गायकवाड, एकनाथ गेलेवाड शुभम पटवेकर, मनीष भगत, अभी इंगोले, गोपाल पोतघुले, शुभम धायडे, साहिल सय्यद, मोहम्मद शेख,अदी जण उपस्थितीत होते,वारवार खंडीत होणारा विज पूरवठा सूरळित झालाऩाहीतर सविधान पध्दतीने आंदोलन करु असा इशारा ही परवेज बेग यांनी दिला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...