श्री गुरुदेव विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय जवळा ने राखली उत्कृष्ठ निकालाची परंपरा*

*श्री गुरुदेव विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय जवळा ने राखली उत्कृष्ठ निकालाची परंपरा*
जवळा ग्रामीण भागात शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या जवळा ता.आर्णी येथील श्री गुरुदेव विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय जवळा ने दहावी च्या उत्कृष्ठ निकालाची परंपरा यावर्षी सुद्धा कायम राखली. दहावी च्या परिक्षेस बसलेल्या १६५ विद्यार्थ्यांपैकी १४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
त्यापैकी ५० विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले. शाळेचा एकुण निकाल ९०.३० टक्के लागला. दहावी सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल १०० टक्के लागला. कु. श्रेया प्रशांत पिसे -९० % गुण घेऊन प्रथम आली तर कु. श्रृती यशवंत सौदागर ही दुसरी आणि कु.चैताली ज्ञानेश्वर जाधव ही विद्यार्थीनी तिसरी आली. संस्थेचे अध्यक्ष श्री गजाननराव सोळंके, सचिव श्री गणेशराव मोरे, संचालक मंडळ, प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक , शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थीनींचे कौतुक केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...