⚡ ब्रेकिंग News

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा शांततेत*

*मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा शांततेत*
आर्णी. तालुक्यातील जवळा येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत कार्यरत अभ्यास केंद्र स्व.भारतसिंह ठाकुर कला व विज्ञान महाविद्यालय जवळा तालुका आणि जिल्हा यवतमाळ येथे मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा शांततेत संपन्न होत आहे. महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये अनेक दलित गरीब वंचित शोषित विद्यार्थी हे आपले अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात जवळा येथील अभ्यास केंद्र स्व. भारत सिंह ठाकुर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जवळा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ येथे मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या परीक्षा दिनांक 24 मे 2024 पासून सुरू झाल्या असून सर्व परीक्षा सुरळीत आणि विद्यापीठाच्या प्रचलित नियमानुसार संपन्न होत आहेत
विदर्भातील तापमान सध्या 45°c वर पोहोचले असताना सुद्धा विद्यार्थी व्यवस्थितपणे प्रशस्त हवेशी रूममध्ये आपले परीक्षा संपन्न करीत आहे विद्यार्थ्या वर्गातून आनंदाची प्रतिक्रिया यावेळेस ऐकायला मिळत आहे परीक्षा दरम्यानच्या भरारी पथक प्रमुख डॉ. गजानन नीचात यांनी भरारी पथकाद्वारे भेट देऊन सर्व प्रकारच्या यंत्रणे विषयी समाधान व्यक्त केले यावेळेस त्यांचे समवेत प्रा. गायत्री कलंत्री,डॉक्टर पवन चांडक हे ही उपस्थित होते. ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या या अभ्यास केंद्राचा पूर्णपणे उपयोग ग्रामीण विद्यार्थी आणि विशेष करून विद्यार्थ्यांना होणार आहेत या परीक्षे ला बहिष्ठ पर्यवेक्षक म्हणून प्रा. लाहे काम पाहत असून अभ्यास केंद्रावरील सर्व कर्मचारी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहे
परीक्षा केंद्र वरील सर्व परीक्षा पद्धतीच्या विद्यापीठाच्या प्रचलित नियमाला अनुसरून आहे ही बाब विशेष असल्याचे मत भरारी पथकातील डॉ.गजानन नीचात यांनी व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...