⚡ ब्रेकिंग News

दुर्गम नवनगर गावातील सौरभने मिळविले NEET परिक्षेत 720 पैकी 700 गुण, तसेच जवळा येथील श्रेयस राजुभाऊ टाके 720 पैकी 673 गुण

दुर्गम नवनगर गावातील सौरभने मिळविले NEET परिक्षेत 720 पैकी 700 गुण तसेच जवळा येथील श्रेयस राजुभाऊ टाके यांचा मुलगा श्रेयस याने 720 पैकी 673 गुण घेऊन
श्री गुरुदेव विद्यामंदिर जवळाचा माजी विद्यार्थी सौरभ गजानन काळे याने नुकत्याच निकाल जाहीर झालेल्या NEET परिक्षेत 720 पैकी 700 गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे. देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी NTA ही केंद्रीय संस्था NEET परिक्षेचे आयोजन दरवर्षी करते. यावर्षी देशभरातुन विक्रमी 23 लाख विद्यार्थी या परिक्षेत बसले होते. त्यामुळे MBBS admission करिता प्रचंड चुरस आहे.सौरभ जवळा गावापासून 5 किमी दुर असणाऱ्या नवनगर या अतिशय दुर्गम गावातील विद्यार्थी आहे. वडिलांचे छत्र लहानपणीच हरवलेल्या सौरभने आपले शालेय शिक्षण श्री गुरुदेव विद्यामंदिर जवळा येथुन पूर्ण केले. शांत स्वभावाच्या सौरभने अतिशय जिद्दीने, मेहनतीने अभ्यास करून हे यश संपादन केले आहे. डॉक्टर होण्याचे त्याच्या आईचे आणि त्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.
तसेच जवळा गावचे प्रतिष्ठीत नागरीक टाके ज्वेलर्स चे संचालक श्री. राजुभाऊ टाके यांचा मुलगा श्रेयस याने यावर्षी झालेल्या NEET परिक्षेमध्ये 720 पैकी 673 गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले व आपला प्रवेश MBBS करीता निश्चित केला. त्याबद्दल श्रेयसचे, त्याच्या आईवडीलांचे व संपूर्ण टाके परिवाराचे हार्दीक अभिनंदन
त्याला AIIMS या नावाजलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन MBBS Doctor व्हायचे आहे.त्याला भावी वाटचालीकरिता भरभरून शुभेच्छा....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...