७२ वर्षांनंतर श्रावणाची सुरुवात होणार सोमवारी*

७२ वर्षांनंतर श्रावणाची सुरुवात होणार सोमवारी
देवाधिदेव महादेवाची आराधना भाविक वर्षभर करीत असतात. पण, महादेवाला श्रावण महिना सर्वांत प्रिय मानला जातो. या महिन्यात दर सोमवारी विशेष अभिषेक, पूजा केली जाते. यंदा ७२ वर्षानंतर हा दुर्मीळ योग आला आहे. श्रावणाची सुरुवात व शेवट सोमवारीच होणार आहे. *१९५३ या वर्षी आला होता योग* यंदा श्रायणाला ५ ऑगस्ट सोमवारी सुरुवात होत आहे तर सांगता २ सप्टेंबर सोमवारी होणार आहे. ३ सप्टेंबरला श्रवण अमावस्या आहे. श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सोमवार येण्याचा हा ७२ वर्षांनंतरचा अतिशय दुर्मीळ योग आहे. यापूर्वी सोमवार १० ऑगस्ट १९५३ श्रावणाला सुरुवात तर ८ सप्टेंबर १९५३ ला शेवटचा सोमवार आला होता . *१८ वर्षांनंतर यंदा ५ श्रावणी* • श्रावणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ५ श्रावणी सोमवार असणार आहेत. यामुळे भाविकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. • आधी असा योग २००६ यावर्षी आला होता. मागील वर्षी २०२३ ला अधिक मासामुळे श्रावण दोन महिने होता. या काळात ८ श्रावणी सोमवार आले होते. *यंदाचे श्रावणी सोमवार* पहिला सोमवार- ५ ऑगस्ट दुसरा सोमवार- १२ ऑगस्ट तिसरा सोमवार-१९ ऑगस्ट चौथा सोमवार २६ ऑगस्ट पाचवा सोमवार २ सप्टेंबर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...