⚡ ब्रेकिंग News

खैर लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला

खैर लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला काळी दौ. वनपरिक्षेत्राची कामगिरी
काळी (दौ) दिनांक ०९ जुलै रोजी वनविभाग पुसद अंतर्गत काळी दौ. वनपरिक्षेत्रात गुंज वर्तुळ वनोपज धनोडा येथील तपासणी नाक्यावर खैर लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक सापळा रचून पकडण्यात आला ट्रक क्र. एम एच २६ बी इ ५३५४ परवाण्यापेक्षा जास्त खैर लाकडाची वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती काळी दौ. वन परीक्षेत्र कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर सापळा रचून त्यांनी धनोडा नजीक सदर ट्रक पकडून ताब्यात घेतला, सखोल चौकशी अंती परवाण्यापेक्षा जास्त अवैध वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वनविभागाकडून कारवाई करण्यात आली ,पुढील तपास पुसद वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. बी एन स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली एस जी नरोड सहाय्यक वनसंरक्षक पुसद ,सम्राट मेश्रामवनपरिक्षेत्र अधिकारी ( प्रादे. ) काळी दौ. ,संतोष बदुकले क्षेत्र सहाय्यक गुंज वर्तुळ ,वनरक्षक सुनील येरवाळ, राजीव केंद्रे ,नंदकिशोर राठोड ,मुकिंदा हगवणे ,वनमजूर श्रीकांत डोरले , वाहन चालक कृष्णा वायकुळे यांनी विशेष परिश्रम घेतले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...