⚡ ब्रेकिंग News

मुडाणा येथे सरपंच पदावर वैभव बरडे पुन्हा रुजू

मुडाणा येथे सरपंच पदावर वैभव बरडे पुन्हा रुजू
सरपंच अपात्रतेच्या आदेशाला स्थगिती महागांव तालुक्यातील मुडाणा येथील सरपंच वैभव बरडे यांनी विकास कामात अडथळा आणल्यामुळे, मासिक सभा न घेतल्यामुळे, व विविध कारणामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच विरोधात प्रकरण दाखल केले होते. त्या प्रकरणावर अप्पर जिल्हाधिकारी यांनी दी.१० जून रोजी त्यांना सरपंच पदावरून अपात्र घोषित केले होते. त्यामुळे गावात खळबळ उडाली होती.
या आदेशा विरोधात वैभव बरडे यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या आदेशाविरोधात २७ जून रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन.आर. बोरकर यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांना १० जून रोजी पारित केलेल्या आदेशास स्थगिती दिली. हा आदेश रीट याचिका गुणवत्तेवर निकाली निघे पावेतो मंजूर करण्यात आलेला आहे. सरपंच वैभव बरडे यांची बाजू एडवोकेट झाडे यांनी मांडली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...