*चिल्ली येथील दरोडा प्रकरणातील सर्व गुन्हेगाराला तात्काळ अटक करा*
प्रा. डॉ. मीनाक्षी सावळकर यांची मागणी
महागांव तालुक्यातील चिल्ली या गावांमध्ये एका महिन्यापूर्वी मोठा दरोडा पडला होता. त्या दरोडा प्रकरणातील काही आरोपींना अद्यापही अटक करण्यात आली नसल्याने त्या आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी डॉ. प्रा. मीनाक्षीताई सावळकर यांनी पोलीस अधीक्षकांना केली आहे.
पांडे कुटुंबातील संपत्ती लुटून दरोडेखोर अद्यापही मोकाट फिरत आहे. या दरोडेखोरांना ताबडतोब अटक करून जास्तीत जास्त शिक्षा करावी व असा दरोडा पुन्हा घडणार नाही याची दक्षता पोलिस यंत्रणे घ्यावी असे निवेदनात मीनाक्षीताई सावळकर यांनी नमूद केले आहे. हे निवेदन मीनाक्षी सावळकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यकारी सदस्य, विद्या पाताल, बन्सी सरस्वती ठाकूर, सुमन चव्हाण, शीला पवार, रंजना गोगटे व आदी महिलांनी दिले आहे.
गुन्हेगारांचा शोध घेणे सुरूच असून आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर योग्य कारवाई केल्या जाईल. तसेच आमचा शोध घेणे सुरूच आहे. संबंधित पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे.
पवन बन्सोड - जिल्हा पोलीस अधीक्षक
चिल्ली येथील दरोडा प्रकरणातील सर्व गुन्हेगाराला तात्काळ अटक करा*
Bhagirath Raja 24 News.com
0




टिप्पणी पोस्ट करा