⚡ ब्रेकिंग News

महागांव पोलिसांचा गावठी दारु अड्यांवर छापा

महागांव पोलिसांचा गावठी दारु अड्यांवर छापा
दोन हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी गुंज येथिल असलेल्या एका मोहफुलाच्या गावठी दारुभट्टीवर गुरुवारी (ता.११) रोजी छापा टाकला. शिवाय, संपूर्ण साहित्य नष्ट करण्यात आले. गुंज येथे अवैद्य देशी दारुची विक्री सुरु असल्याचे कळताच पोलिसांनी विशेष मोहीम राबवून पाहणी केली.
तिथे दारू काढली जात असल्याचे स्पष्ट होताच छापा मारला. दरम्यान, पोलिसांनी ४० लिटर मोहामास सडवा किंमत अंदाजे दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन नष्ट करण्यात आला. संशयित आरोपी यांचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे. हि कारवाई महागांव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनराज निळे यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार रामराव आडे, कैलास मुकाडे यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...