⚡ ब्रेकिंग News

महागाव परिसरात गावठी दारू सह विदेशी दारू. उत्पादन शुल्क विभाग कारवाई करणार का?

महागाव परिसरात गावठी दारू सह विदेशी दारू. उत्पादन शुल्क विभाग कारवाई करणार का?
नागपंचमीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून आत्तापासूनच गावागावात जुगार आणि दारूचा महापूर आलेला आहे.यात महागाव तालुक्यातील धारमोहा, मुडाणा,पिंपळगाव,फुलसावांगी, सवना, मोहदी, सातघरी, पोहंडूळ या सह परिसरातील गावात गावठी दारू मोठ्याप्रमाणात गाळप होत असल्याच्या गाव पुढाऱ्या मधून नावं न सांगण्याच्या अटीवर तोंडी तक्रारी येत आहेत.उत्पादन शुल्क विभागातील काही मुरब्बी कर्मचाऱ्यांना महागाव तालुक्यात कुठे कुठे की दारू गाळप होते याची जाण असताना कार्यवाहीत दिरंगाई दिसून येत आहे.त्यामुळे सदर विभागाच्या कार्यप्रणालीवर नागरिकांतून संशय व्यक्त केल्या जात आहे.
कार्यवाही करून सोडल्या नंतर परत- परत आणखी तेच दारूचे अड्डे सक्रिय होतात.स्थानिक पोलीस प्रशासनातील बीट जमादार सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे महागाव तालुक्यातील शांतता व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे सबंधित विभागाने या संदर्भात तत्काळ दखल घेऊन कार्यवाही करण्यात यावी अशी जनभावना आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...