बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार.* काळी दौ. वनपरिक्षेत्रातील घटना.

*बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार.* काळी दौ. वनपरिक्षेत्रातील घटना.
महागाव तालुक्यातील काळी दौलत वनपरिक्षेत्र कार्यालय हद्दीत येणाऱ्या माळवागद शेतशिवारात बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार झाल्याची घटना बुधवारी २४ जुलै रोजी उघडकीस आली. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी बाबुसींग दलसिंग चव्हाण रा.माळवाकद यांचा बैल काल दिनांक २३ जुलै रोजी घरुन गाईसोबत गावालगत असलेल्या नाल्याकडे चरण्यासाठी गेला असता झुडुपात दबा धरून बसलेल्या बिबटयाने अचानक बैलावर हल्ला करून जागीच ठार केले.
या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी काळी दौलत वनपरिक्षेत्र कार्यालयात दिली, या घटनेत शेतकऱ्यांचे अंदाजे ४० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले, गेल्या एका महिन्यामध्ये हा बिबट्याचा दुसरा हल्ला असुन काही दिवसांपुर्वी एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते, या घटनेमुळे गावातील नागरिकात दहशत पसरली आहे वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाईची द्यावी अशी मागणी होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...