नाल्याला पूर आल्याने शेतकऱ्याचा गाय व गोरा पुराच्या पाण्यात गेला वाहून*

*नाल्याला पूर आल्याने शेतकऱ्याचा गाय व गोरा पुराच्या पाण्यात गेला वाहून*
(सावळी सदोबा परिसरातील उमरी कोपेश्वर येथील घटना) सावळी सदोबा:-आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील उमरी कोपेश्वर येथील शेतकरी दत्तात्रेय समीर यांच्या शेतात काम करणारा सालगडी रामदास तोडसाम संध्याकाळी शेतीची कामे करुन घरी येत असताना,अचानक शेत रस्त्यावर असलेल्या उमरी कोपेश्वर ते झापरवाडी या रस्त्याच्या मार्गावरील नाल्याला मोठ्या प्रमाणात पावसाचा पूर आला,दुपारपासून चालू असलेले मुसळधार पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व कामे बंद झाली होती,
शेत शिवारातील सर्व शेतकरी,शेतमजूर आपापल्या घराच्या दिशेने निघाले होते,नाल्याला आलेल्या पुराचे पाणी वाढत असल्याने,संध्याकाळ झाली घरी जायचं कसा असा विचार करून अलगड्याने पुराच्या पाण्यातून मार्ग काढला,मात्र बैलगाडी आणि गाडीला मागे गाय आणि गोरं बांधून पुराच्या पाण्यातून मार्ग काढत असताना,अचानक पुराचे पाणी वाढल्याने गाडीमागे बांधून असलेली गाय व गोर पाण्यात वाहून गेले,नाल्याला पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने दूर-दूर पर्यंत गाई आणि गोऱ्याचा कुठेच पत्ता लागला नाही,या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले,या घटनेतील सालगडी,बैलगाडी पुराच्या पाण्याबाहेर सुखरूप निघाले,मात्र गाडीमागे बांधून असलेली गाय व गोरा पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी हताश झाला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...