ओव्हरलोड वाहतुकीमुळे तेजापुर - चिलई रस्त्याची दुरावस्था ....

ओव्हरलोड वाहतुकीमुळे तेजापुर - चिलई रस्त्याची दुरावस्था .
ग्रामस्थांच्या वतीने साखळी उपोषणाचा इशारा... वणी :- तालुक्यातील तेजापुर चिलई मार्गावर डोलो माईडची ओव्हरलोड वाहतूक चालत असल्याने संपूर्ण मार्ग भुईसपाट आल्याने गावकऱ्यांना दळण वळण करणे अत्यंत अवघड झाल्याने मार्ग दुरुस्त करा अन्यथा रस्ता रोको आंदोलन करणार असा इशारा ते ग्रामवासीयांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे. सविस्तर वृत्त असे की, तेजापुर - चिलई शिवारात एकस्ली फिनली लिमिटेड चिलई, सूर्या डीलाईट गणेशपुर, ईशान कल्सी गानेशपुर आदी कंपन्या असून या कंपन्यांतील वाहतूक करणारे वाहने क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहून नेत असल्याने सार्वजनिक वापराचे सर्व रस्ते भुईसपाट झाले आहे. त्यामुळे या भागातील सर्व नागरिकांना तारेवरची कसरत करून मार्ग भ्रमण करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अत्यंत अवघड झाले असून दुचाकी, ऑटो सुधा चालवणे कठीण होत आहे. या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप गावकरी करीत आहे. वरील कंपन्यांनी १ तारखेपर्यंत रस्ता दुरुस्त करून द्यावा अन्यथा बेमुदत रस्ता रोको व आमरण साखळी उपोषण करण्याचा इशारा तेजापुर चिलई ग्रामवासीयानी दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...