आर्णी तालुक्यात ९४ शिक्षकांची पदे रिक्त |
आर्णी : शैक्षणिक सत्र सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. अशातही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नसल्याने
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आर्णी तालुक्यात ९४ शिक्षकांची पदे रिक्त असल्याने ग्रामीण व आदिवासी दुर्गम भागात शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे.आर्णी तालुक्यात ११७ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत. यामध्ये ३५५ शिक्षक कार्यरत आहे. त्यामुळे तालुक्यात ९४ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. तालुक्यातील सर्व शाळांची घंटा वाजून तेथे वेळापत्रकानुसार शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. मात्र ग्रामीण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे प्राथमिक धडे देणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमध्ये पूर्ण संख्येने शिक्षक उपलब्ध नाहीत. मोठ्या प्रमाणात शिक्षकाच्या रिक्त असलेल्या पदामुळे तालुक्यातील बहुतांश प्राथमिक शाळेची अवस्था दयनीय झाली आहे. तालुक्यातील अंजनखेड १, शेलु (शे)१, शारी २, इचोरा १, दहेली १, उमरी (कापे) १, कापेश्वर १, पाळोदी २, आयता २, आयता हेटी २, खडका १, चिमटा २, तळणी १, बोरगाव पुंजी १, अंजी नाईक १, पहूर २, भंडारी शिवर १, कारेगाव १, महाळुंगी १, भंडारी २, लिंगी १, नवनगर १, किनी १, हेटी (जवळा) १, हरलाल हेटी १, चांदणी २, ब्राह्मणवाडा १, शेकलगाव १, शेलू (ब्रा.) १, गवणा १, पारधी तांडा १, बोरगाव २, पांगरी २, दाभडी १, म्हसोला २, विठोली १, आसरा १, आमणी१, सुकळी २, देरूवाडी (बु.)२, पाभळ २,
कुऱ्य्हा (डू.) १, केळझरा (कों.)१, पिंपळनेर १, तळेगाव १, भानसरा १, कोळवण (मोठे.)१, देऊळवाडी नाईकनगर १, बेलोरा वन २, वरुड भक्त २, हेटी नाईक नगर १, येरमल २, चातारी १, कवठा बाजार २, शेंदूर सनी १,आंबोडा १, ईवळेश्वर १, दोनवाडा १,लोणी ३, तरोडा १, गणगाव १,अकोला १, बीड १, सावळी २, पळशी २,कनीराम तांडा १, बारभाई १, गुडा २, उर्दू स्कूल सावळी १,
अशा 70 शाळांतील ९४ शिक्षकांची पदे रिक आहेत याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी संबंधित विभागाने तालुक्यातील शिक्षक पदे भरण्याची मागणी होत आहे.
आर्णी तालुक्यात ९४ शिक्षकांची पदे रिक्त |
Bhagirath Raja 24 News.com
0


टिप्पणी पोस्ट करा