कामगाराच्या हक्कासाठी टिकास फावडे आंदोलन

कामगाराच्या हक्कासाठी टिकास फावडे आंदोलन डॉ विष्णू उकंडे यांच्या नेतृत्वात आंदोलन
आर्णी. कामगाराच्या विविध मागण्याकरिता डॉ विष्णू उकंडे यांच्या नेतृत्वात आर्णी येथे टीकास फावडे आंदोलन दिनांक 5/7/2024 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते तहसील कार्यालय आर्णी पर्यंत काढण्यात येत असून तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ विष्णू उकंडे यांनी केले आहे. सरकारी कामगार कार्यालय यवतमाळ यांनी कामगारांना अतिशय हतबल करून टाकले असून कामगाराना कार्ड तथा योजना भेटू नये अशी भूमिका घेतली आहे.
त्यांच्या विरोधात डॉ विष्णु उकंडे यांनी आंदोलन छेडले असून या आंदोलनात त्यांच्या मागण्या मध्ये कामगारांना किचन सेट देण्यात यावे .कामगारांना 90 दिवसाच्या प्रमाणपत्राकरिता ग्रामसेवकाकडून नाहक होणारा त्रास दूर करावा व त्यांना सह्या द्याव्या . कामगाराचा अर्ज विनाकारण कामगार कार्यालय यवतमाळ येथून त्रुटीत काढल्या जातात ते बंद करावे व कामगारांना तात्काळ कामगार कार्ड देण्यात यावे आर्णी केळापूर विधानसभेतील कामगारांना घरकुल देण्यात यावे. कामगाराच्या पाल्यांना शिष्यवृत्ती तथा योजना तात्काळ देण्यात याव्या.
पूर्वी ज्यांच्याकडे कामगार कार्ड होते परंतु एक वर्ष अथवा जास्त विलंब झाल्याने ती नूतनीकरण होत नाही ते नूतनीकरण करण्यात यावे अशा विविध मागण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन डॉ विष्णू उकंडे यांनी केले असून हजाराच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ उकंडे यांनी केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...