तीन आरोपीला अटक, पाच लाखाचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिवरासंगम येथील शेतकऱ्यांनी आपल्या गोठ्यामध्ये ठेवलेले शेती साहित्य आणि अवजारे तसेच ट्रॅक्टर चोरून नेले होते या प्रकरणी महागाव पोलिसांनी अज्ञात आरोप विरुद्ध गुन्हा दाखल केला होता दरम्यान या आरोपींना पकडणे पोलिसांसाठी आव्हान ठरले असतानाच स्थानिक गुन्हे शाखा आणि महागाव पोलीस यांनी समांतर तपास सुरू केला यात तीन आरोपी पोलिसांच्या हाती लागले असून पोलिसांनी त्यांच्याकडून पाच लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या संदर्भात विस्तृत असे की, हिवरा संगम येथील शेतकरी यांनी आपल्या शेतामध्ये एक गोठा बांधून त्याला कुलूप लावले होते दरम्यान आरोपींनी त्या गोठ्याचे कुलूप तोडले तसेच वरचे तीनही काढले आणि त्यातून आत मध्ये उतरून जे जे साहित्य हाती लागल तेथे
चोरून नेले यामध्ये शेतीचे अवजारे
तसेच एक ट्रॅक्टर आणि इतर साहित्याचा
समावेश होता या प्रकरणात पोलिसांनी तपास केल्यानंतर यातील आरोपी शेख मुजीब शेख हजमा वय वर्ष 38 स्वप्निल गोविंदराव गायकवाड वय वर्षे 25
ऋषिकेश संतोष राजवाडे वय वर्ष 22 राहणार हिवरासंगम या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले सोबतच एक चोरीची मोटरसायकल देखील आरोपींकन जप्त करण्यात आली आहे पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत किमान पाच लाख रुपये पेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेच्या पथकातील पोलीस निरीक्षक आधार सिंग सोनेने तसेच महागाव पोलिसांनी केला होता.
तीन आरोपीला अटक, पाच लाखाचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा