शेतकऱ्यांच्या समस्येकडे कृषी अधिकाऱ्यांनी फिरविली पाठ
कृषी अधिकारी आले अन् गेले पीक रोगावर मार्गदर्शन करणार कोण..?
महागाव तालुक्यात मागील पंधरा दिवसात सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात यलो मोझाक या रोगाने थैमान घातले आहे या करीता ऊपाय योजना सुचवाव्या या हेतुने २६ जुलै रोजी शेतकऱ्यांनी तहसीलदार महागाव यांचे मार्फत जिल्हाधीकारी, व जिल्हा कृषी अधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले होते त्या अनुषंगाने आज ३१ जुलै रोजी जिल्हा कृषी अधीकारी व तज्ञांची टीम आठ दहा गाड्यांचा ताफा घेऊन अंबोडा येथे रोग ग्रस्त पावडे यांचे शेतात पाहणी करीता आले असता कुठलेही ठोस ऊपाययोजना करण्याचे सांगीतले नाही यावेळी अमृतराव देशमुख यांनी येलो मोझक रोगा बाबत ऊपाय योजना विचारताच ऊडवाऊडवीची ऊत्तर देऊन त्या ठिकानावरून निसटता पाय घेतला. शेतकऱ्यांना समाधानकारक ऊत्तर न मिळाल्याने कृषी अधिकारी यांचे वाहनासमोर शेतकरी आडवे झाले तेव्हा आपले समाधान करण्यासाठी परत येतो असे सांगुन कृषी अधिकारी निघुन गेले त्यामुळे पीक रोगावर मार्गदर्शन करणार कोण..? असा प्रश्न शेतकरी विचारत आहे.
वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गोविंदराव देशमुख (सवनेकर) भावराव पावडे, शरद देशमुख, चक्रधर पाटे, अंबोरे व परीसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
शेतकऱ्यांच्या समस्येकडे कृषी अधिकाऱ्यांनी फिरविली पाठ
Bhagirath Raja 24 News.com
0

टिप्पणी पोस्ट करा