कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांने केली शेतातच गळफास लावून आत्महत्या*

*कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांने केली शेतातच गळफास लावून आत्महत्या*
आर्णी तालुक्यातील खेड (बिड) येथील शेतकऱ्यांने सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या शेतामध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास खेड परीसरात उघडकीस आली,आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव वंसता जेता राठोड वय 52 वर्षे रा.खेड असे मृतकाचे नाव आहे,त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची चार एकर शेती आहे,या शेतीवर मध्यवर्ती बँकेचे अंदाजे एक लाख रुपये कर्ज आहेत.मृतक वसंता हा नेहमीच कर्जाच्या विवंचनेत राहत होता.गेल्या वर्षी झालेल्या नापिकीमुळे बँकेचे व खाजगी कर्ज न फिटल्याने तो नेहमी निराश राहत होता,त्यामुळेच त्यांने आत्महत्या केली असल्याचे कुटुंबातील नातेवाईकांनी सांगितले, मृतकाच्या मागे एक मुलगा,दोन मुली ,नात,नातू असा मोठा आप्त परिवार आहे,कुटुंबाचा कमावता व्यक्ती गेल्याने कुटुंबातील नातेवाईकांनी हळहळ व्यक्त केली,

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...