⚡ ब्रेकिंग News

सक्षम नागरिक घडवण्याची ताकद राष्ट्रीय सेवा योजनेत प्राचार्य डॉक्टर विलास राऊत

सक्षम नागरिक घडवण्याची ताकद राष्ट्रीय सेवा योजनेत प्राचार्य डॉक्टर विलास राऊत
राष्ट्रीय सेवा योजना ही उत्कृष्ट नागरिक निर्मितीचा कारखाना आहे यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने या योजनेत हिरारीने भाग घ्यावा असे प्रतिपादक राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रथम पथकाच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉक्टर विलास राऊत यांनी केले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत स्व. भारत सिंह ठाकूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जवळा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ येथे विद्यापीठाच्या वतीने नुकतेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाला मान्यता देण्यात आली त्याचा उद्घाटन सोहळा दिनांक 10 ऑगस्ट 2024 शनिवारी संपन्न झाला
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. भारत सिंह ठाकूर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर प्रमुख मान्यवरांचे स्वागत घेऊन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व उत्तम नागरिक बनण्याची प्रक्रिया समाजाच्या विकासासाठी आपण काय प्रयत्न करावे याविषयी मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य विलास राऊत यांनी सांगितले की शिक्षण घेऊन उत्कृष्ट नागरिक तयार करणे हे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख कार्य आहेत आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा समाजहित राष्ट्रहितासाठी सदैव तत्पर असले पाहिजे असे प्रतिपादन यावेळी केल्या गेले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ अनंतसिंह ठाकूर प्रा. मीनाक्षी गावंडे आदिवासी सेवक गोविंदराव भिसे यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साक्षी काटकर अनिस सोलंकी , पुरुषोत्तम ठाकरे, पल्लवी रामजीरकर ,अश्विनी काळे, अश्विनी शिकारे ,दत्ताजी तडसे ,यांनी प्रयत्न केले तर कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक ज्योतिपाल देशपांडे यांनी केले राष्ट्रीय सेवा योजनेची पथक निर्मिती महाविद्यालयात झाल्यामुळे विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण यावेळी दिसून येत आहे ही बाब विशेष

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...