घरकुल लाभार्थी थकीत अनुदान व बांधकामासाठी रेतीच्या प्रतिक्षेत!
आर्णी:- आर्णी शहरासह तालुक्यात सध्या रमाई, प्रधानमंत्री व शबरी घरकुल योजनेचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करण्या करीता अनुदानाचे काही हप्ते देण्यात आले आहे. तर कुठे कुठे पहिल्याच हप्त्या वर काम थांबले आहे. त्यामुळे उर्वरित रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा न झाल्याने उर्वरित बांधकाम ठप्प झाले आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने लाभार्थ्यांना उघडल्यावर आपला संसार चालवावा लागत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास रेती काढण्यास परवानगी देण्याबाबतचे सरकारने परिपत्रक काढले. मात्र, तालुक्यात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसते. घर बांधण्यासाठी सरकारकडून मिळणारे अनुदान कमी आहे. त्या तुलनेत बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे एवढ्या अल्प रकमेत घर कसे बांधावे, असा प्रश्न लाभार्थ्यापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे 'सर्वांसाठी घर' देण्याचे स्वप्न भंगणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
▪️अनेकांचे स्वप्न अधुरे :
आपले स्वतःचे घर असावे, असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. यासाठी प्रत्येकजण धडपड करत असतो, अनेकवेळा उसनवारीने पैसा काढून बांधकामासाठी लागणारे साहित्य खरेदी करतो. परंतु, घर मंजूर असतानाही एवढया अल्प पैशांत घर कसे बांधावे, हा मोठा प्रश्न लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.
घरकुल लाभार्थी थकीत अनुदान व बांधकामासाठी रेतीच्या प्रतिक्षेत!
Bhagirath Raja 24 News.com
0


टिप्पणी पोस्ट करा