⚡ ब्रेकिंग News

संजय खाडे फाउंडेशन तर्फे सुरू करण्यात येणाऱ्या महात्मा फुले अभ्यासिकेचे आज उद्घाटन !

संजय खाडे फाउंडेशन तर्फे सुरू करण्यात येणाऱ्या महात्मा फुले अभ्यासिकेचे आज उद्घाटन !
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार
वणी येथील काँग्रेसचे युवा नेते म.रा. कापूस उत्पादन संघ मुंबईचे संचालक संजय भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून संजय खाडे फाउंडेशन द्वारा स्मृतीशेष रामचंद्र पाटील खाडे यांच्या स्मरणार्थ स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यां करिता महात्मा फुले अभ्यासिक सुरू करण्यात येत आहे. सदर अभ्यासिकेचे उद्घाटन हे दिनांक 12 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर भालचंद्र चोपणे यांचे अध्यक्ष खाली व चंद्रपूर,वणी व आणिऺ लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सदर कार्यक्रमात विशेष प्रमुख उपस्थिती म्हणून सुधाकर अडवाले आमदार विपस, व माजी आमदार वामनरावजी कासावार यांची राहणार आहे. तर प्रमुख उपस्थिती म्हणून नरेंद्रजी ठाकरे माजी उपाध्यक्ष जि प यवतमाळ, एडवोकेट देविदास काळे अध्यक्ष रंगनाथ स्वामी नागरी पतसंस्था वणी , प्रा दिलीप मालेकर क्रीडा प्रशिक्षक, विजय मुकेवार अध्यक्ष शिप्रम वणी, सौ अरुणाताई खंडाळकर माजी सभापती महिला व बालकल्याण जि प यवतमाळ इत्यादि राहणार आहेत. काँग्रेसचे ॲक्टिव्ह युवा नेते संजय खाडे यांनी कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या दलित, बहुजन व गरीब विद्यार्थ्या करिता 'महात्मा ज्योतिबा फुले' अभ्यासिका सुरू केल्यामुळे वणी विधानसभा मतदार संघातील स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या सर्वसाधारण गरीब विद्यार्थ्यांना वणी मध्ये फार मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
सदर अभ्यासिका चे उद्घाटन हे दिनांक 12 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता झाल्यानंतर पुढील कार्यक्रम हा शेतकरी मंदिर वणी येथे होणार आहे. त्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात संजय बाबू खाडे यांचे पुढाकारात 10 वीं व 12 वी परीक्षे मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कारही मान्यवराच्या हस्ते होणार आहे. काँग्रेसचे युवा नेते संजयजी खाडे यांनी त्यांचे वडील रामचंद्र पाटील खाडे यांच्या स्मरणार्थ "महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिका" सुरू केल्याबद्दल त्यांचे संपूर्ण वणी विधानसभा मतदार संघांमध्ये संपूर्ण जनतेकडून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...