आज विश्रामगृह आर्णी येथे विद्यार्थी सेनेची बैठक संपन्न

आज आर्णी विश्रामगृह येथे विद्यार्थी सेनेची बैठक संपन्न
आज विद्यार्थी सेनेची आर्णी विश्रामगृह येथे बैठक पार पडली सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब तसेच युवा सेना पक्षप्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या विचारास एक होऊन विद्यार्थी सेनेचे प्रमुख वरून सरदेसाई साहेब यांच्या आदेशाने व माननीय जिल्हाप्रमुख यवतमाळ जिल्हा प्रवीण भाऊ शिंदे यांच्या कार्यास प्रेरित होऊन.विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख श्री कृष्णा भाऊ निंबर्ते ,सौरभ लोंढे. ऋतिक सावंत यांच्या उपस्थितीत आजची बैठक पार पडली त्यांनी या बैठकीत विद्यार्थ्यांनी आता विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याकरिता रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे व आपल्या विद्यार्थी विद्यार्थिनी ना लढण्याची ताकद आपल्याला द्यायची आहे याकरिता आर्णी शहरांमध्ये विद्यार्थी सेनेचे संघटन वाढवण्याची गरज आहे आणि विद्यार्थ्यांच्या समस्या या महाराष्ट्रात खूप आहेत त्या सोडवण्याकरिता समस्त विद्यार्थ्यांना विद्यार्थी सेनेच्या संघटनेमार्फत पूर्ण करण्याचे प्रयत्न करायचे आहे याकरिता आपण सर्वांनी विद्यार्थी सेने सोबत येऊन कार्य करावे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. चेतन जाधव, तोफिक खान,अमिर शेख ,राहुल राठोड,अभी जाधाव, देव त्रिवेदी,अक्षय राठोड,प्रथमेश राठोड,रोशन राठोड,सुजल राठोड या बैठकीत उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...