⚡ ब्रेकिंग News

जवळा येथे काका पुतण्याचा मृत्यू एकाच दिवशी पहा सविस्तर बातमी

जवळा येथे काका पुतण्याचा मृत्यू एकाच दिवशी पहा सविस्तर बातमी
#काकांचा मुतदेह असलेल्या शवपेटीचा शॉक लागून पुतण्याचा मृत्यू
#जवळा येथील गुल्हाने कुटुंबातील काका पुतण्याचा मृत्यु जवळा आर्णी तालुक्यातील जवळा येथील प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच प्रभाकरराव गुल्हाने वय वर्ष ८० यांचे दीर्घ आजाराने आज १४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांचा मृतदेह ठेवण्याकरिता आर्णी येथून शवपेटी आणण्यात आली. त्या शवपेटी मध्ये प्रभाकरराव गुल्हाने यांचा मृतदेह ठेवण्यात आला. त्या दरम्यान त्या शवपेटीच्या फ्रिजरला विद्युत प्रवाह सुरू असताना शवपेटीला स्पर्श होताच विजेच्या धक्क्याने पुतण्या साहीठला फेकल्या गेल्यामुळे पुतण्याचा मृत्यु झाला. गणेश गुल्हाने (वय ५५) असे मृतक पुतण्याचे नाव आहे . विजेच्या धक्का बसल्याने ते जागेवरच कोसळले. गंभीर अवस्थेत त्यांना आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गणेश गुल्हाने हे जवळा येथील युवा व्यावसायिक होते. या घटनेच्या विरहात त्यांचा भाऊ अनिल गुल्हाने वय वर्ष ५३ यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना यवतमाळ येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. काकांच्या पाठोपाठ पुतण्याचा मृत्यु झाल्याने जवळा येथील आठ दिवसांत विद्युत प्रवाहाची दुसरी घटना असून तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...