*आर्णीत त्रस्त शेतकरी व जनसामान्यांच्या मागण्यासाठी तहसील कार्यालयावर धडकला जन आक्रोश मोर्चा*
राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी च्या वतीने मोर्चा चे आयोजन
मुख्य संपादक गणेश एकंडवार
आर्णी : लाखांचा पोशिंदा असलेल्या शेतकरीला वाऱ्यावर सोडणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात व त्रस्त शेतकरी , जनसामान्यांचा मागण्या घेऊन दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता आर्णी तहसील कार्यालयावर जितेंद्र मोघे यांच्या नैतृत्वात महाविकास आघाडीच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चा ची सुरुवात जुनी बाजार समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पासून सुरु होऊन शहरातील मुख्य बाजार पेठेतील माहूर चौक,बस स्थानक चौक,शिवनेरी चौक ते तहसील कार्यालय वर मोर्चा धडकला. या जन आक्रोश मोर्चातील प्रमुख मागण्या शेतकरीचे सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. रखडलेले घरकुलाचे हफ्ते त्वरित मिळाले पाहिजे व घरकुलाचे सर्व प्रलंबित प्रकरण मंजूर करावे. शेतकरीचे वीज बिल माफ करावे. सर्व प्रकारच्या ग्राहकांचे वाढलेले विजेचे दर कमी करण्यात यावे. पिकविम्याच्या नावाने अल्पशी मदत न देता योग्य मोबदला देण्यात यावा. कामगारांकरिता असणाऱ्या योजनेचा लाभ घेतांना येणाऱ्या अडचणी दुर कराव्या व किचन सेट त्वरित देण्यात यावे. कापूस, सोयाबीनसह सर्व शेतमालाचे पडलेले भाव सुधारून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा. शहरी व ग्रामीण भागातील घरकुलाच्या किमतीतील तफावत दुर करण्यात यावी. तालुक्यातील सतत खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत झालाच पाहिजे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार चे अनुदान त्वरीत देण्यात यावे.वन्यप्राण्यामुळे झालेली पीकांची नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. वन्यप्राण्यापासून पिकाचे संरक्षण करण्याकरिता
१००% अनुदानावर तारकुंपन मंजूर करण्यात यावे. निधीअभावी रखडलेली विकासकामे त्वरित मार्गी लावावी. कृषिपंपाचे लोडशेडिंग बंद करुन दिवसासुद्धा थ्री फेज सप्लाय देण्यात यावे. सिंगल फेज प्रणाली बंद करावी. ठिबक, स्प्रिंकलर इत्यादीचे रखडलेले अनुदान त्वरित देण्यात यावे.अशा आशयाचे निवेदन महाविकास आघाडी तर्फे मा.मुख्यमंत्री यांना तहसीलदार वैशाख वाहूरवाघ मार्फत देण्यात आले.यावेळी जितेंद्र शिवाजीराव मोघे, मा.आमदार बाळासाहेब मुंगीनवार,यवतमाळ मध्यवर्ती बँक अध्यक्ष मनीष पाटील,आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अनिल आडे,प्रदीप वानखडे,सुनील भारती , राजू वीरखडे, सुनील पोटगुलवार,छोटूभाऊ देशमुख,अरिज बेग, बाळासाहेब शिंदे,हरीश कुडे, गणेश मोरे, भारत काळपांडे,अजित राठोड, विनोद पंचभाई, संजय सुखदेवे, अमोल मांगुळकर,अतुल देशमुख,
यांच्या सह मोठ्या प्रमाणात तालुक्यातील शेतकऱ्याची उपस्थिती होती
आर्णीत त्रस्त शेतकरी व जनसामान्यांच्या मागण्यासाठी तहसील कार्यालयावर धडकला जन आक्रोश मोर्चा*
Bhagirath Raja 24 News.com
0




टिप्पणी पोस्ट करा