ह्या माझ्या मुली एक दिवस नक्कीच डॉक्टर इंजिनियर वकील व पायलट बनणार" –तहसीलदार वैशाख वाहुरवाघ

ह्या माझ्या मुली एक दिवस नक्कीच डॉक्टर इंजिनियर वकील व पायलट बनणार" –तहसीलदार वैशाख वाहुरवाघ
आर्णी : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नारायणलीला शाळेचे बॅण्ड पथक तहसील कार्यालय आर्णी येथे 15 ऑगस्ट रोजी 78 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त कवायत संचालन करण्यासाठी गेले होते. आपले वादन कौशल्य सादर करताना बँडच्या तालावर राष्ट्रगीत सादर केले. हे सादरीकरण पाहून माननीय तहसीलदार वैशाख वाहुरवाघ हे भारावून गेले,आणि विद्यार्थ्यांची स्तुती करताना ते म्हणाले की 'इतक्या छोट्या वयात या माझ्यामुली राष्ट्रगीतावर किती छान बँड वाजवतात'. विद्यार्थ्यांसोबत हात मिळवणी करून स्तुतीसुमनाचा वर्षाव केला आणि सर्व विद्यार्थ्यांसोबत फोटो काढले. अल्पोपहाराच्या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना आपल्या सोबत मंचावर बसण्याचा मान सुद्धा दिला व आपल्या केबिनमध्ये त्या सर्वांना बोलावुन खाऊ दिले आणि विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व म्हणाले की ह्या माझ्या मुली एक दिवस नक्कीच डॉक्टर इंजिनियर वकील व पायलट बनणार, आणि आपल्या तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणार हे सर्व बोलत असताना त्यांनी नारायणलीला शाळेला एक दिवस नक्की भेट देणार असल्याचे आश्वासन दिले.
आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांची पाठ थोपटून सर्व विद्यार्थ्यांना शाबासकी दिली तसेच विद्यार्थ्यासोबत फोटो काढत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विकासासोबतच शारीरिक, क्रीडा, व्यक्तिगत विकास असे सर्वांगिण विकास हे एकच ध्येय घेऊन नारायणलीला इंग्लीश मिडीयम ही संस्था दरवर्षी प्रगती करीत आहे आणि ह्याच विषयाला धरून संस्थेचा प्रत्येक सदस्य गौरवांन्वीत झाल्याची भावना व्यक्त करत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...