⚡ ब्रेकिंग News

माहूर गडावरील नारळी पौर्णिमा यात्रेनिमित्त आढावा बैठक संपन्न....!

माहूर गडावरील नारळी पौर्णिमा यात्रेनिमित्त आढावा बैठक संपन्न....!
बस सेवेवर विशेष लक्ष-सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली. माहूर: मुख्य संपादक गणेश एकंडवार दोन दिवसीय परिक्रमा यात्रेला रवीवारपासून माहुर गडावर सुरुवात होणार आहे.सह्याद्री पर्वतात ठिकठिकाणी असलेल्या देवी देवतांचे आणि मठ आश्रमात ऋषी मुनींचे दर्शन घेण्यासाठी स्थळाभोवती प्रदक्षणा घालण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून लाखो भाविक शहरात दाखल होतात. दत्तशिखर कमंडलुतिर्थ, काळापाणी, अनुसयामाता मंदिराच्या पाठीमागील सयामाय टेकडी मातृतिर्थ, पाडंव लेणी, देवदेश्वेरी वनदेव, कैलास टेकडी, शेखफरीद बाबा दर्गा, सर्वतिर्थ या मार्गाने प्रदशिक्षणेला सुरुवात होते. ही परिक्रमा सोमवारी संपणार आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त शहर व परिसरात लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थिती दर्शवितात याच्याच नियोजनासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. मागच्या वर्षीचा तगडा नियोजन पाहता सहायक जिल्हाधिकारी यांनी सर्वच अधिकाऱ्यांना कड्क सूचना केल्या आहेत.यावेळेस एस टी महामंडळ विभागाकडून अतिरिक्त ८० बसेस सोडण्यात येणार आहेत. जुनाट व भंगार बसेस ची त्वरित दुरुस्ती करण्याचे निर्देश सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कवली यांनी केलेले आहे. तसेच एखाद्या ठिकाणी बस बंद पडल्यास तिथून त्याला त्वरित हटविण्याचे आदेश देण्यात आले. पोलिस प्रशासनाकडून जवळपास २५० होमगर्ड व हवालदार तसेच १४ वरिष्ठ अधिकारी नेमण्यात आल्याची महिती पोलिस एसडीपीओ आर एन मलघाने, यांनी दिलेली आहे. नगरपंचायतीने भाविकांसाठी ठिकठिकाणी फिरते शौचालय, पेयजल व्यवस्था केली आहे. स्वच्छता राखण्यासाठी ४५ कर्मचारी नियुक्त केले आहेत. यात्रा मार्गावरील सर्वच खांबावर पथ दिवे सुरु करण्यात आले आहेत अशी माहिती नगर पंचायत मुख्याधिकारी डॉ राजकुमार राठोड यांच्याकडून मिळाली. तसेच आरोग्य विभागाकडून रुग्णालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याला सीपीआर देता येईल याचे प्रशिक्षण 18 तारखेच्या आत द्यावे असे वैद्यकीय अधीक्षक यांना सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी आदेशित केले. दरम्यान बैठीकित राष्ट्रीय महामार्गाचा मुद्दा तापला होता, यात्रेच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्गावर धनोडा जवळ पडलेले खड्डे याला कारणीभूत ठरले. सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली, येत्या दोन दिवसांत खड्डे भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत असे न झाल्यास कारवाईचे आदेश देखील देण्यात आले. दरवर्षी चांगलं होत आलं याही वर्षी चांगलं होईल म्हणून आपण हलगर्जीपणा करू नये प्रत्येक अधिकाऱ्याने यात्रेचे गांभीर्य पूर्ण लक्ष घेणे आवश्यक आहे. कोणत्याही भाविकांना त्रास होणार नाही किंवा गैरसोय होणार नाही याची दक्षता सर्वच विभागाने घ्यावी असे म्हणत बैठकीची समाप्ती झाली.. बैठकीला एसडीपीओ आर एन मलघाने, तहसीलदार किशोर यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, नगर पंचायत मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार राजकुमार राठोड, आरोग्य विभागाकडून आर एस गावंडे, माहूर ग्रामीण रुग्णलयाचे वैदकीय अधीक्षक डॉ बी वाभाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आर एम उमाळे, मीर साजिद अली वन विभाग,व इतर विविध विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...