⚡ ब्रेकिंग News

इस्लाम धार्मियांचे श्रद्धास्थान मोहम्मद पैगंबर यांचे चरित्र हनन करू पाहणाऱ्या भोंदू बाबाला अटक करा आर्णीतील मुस्लिम समाज बांधव आक्रमक !

इस्लाम धार्मियांचे श्रद्धास्थान मोहम्मद पैगंबर यांचे चरित्र हनन करू पाहणाऱ्या भोंदू बाबाला अटक करा आर्णीतील मुस्लिम समाज बांधव आक्रमक !
आर्णी, यवतमाळ : वैजापूर येथील एका कार्यक्रमात उपस्थित जनसमुदायासमोर इस्लामचे आदर्श मोहम्मद पैगंबर यांचे विषयी खोटे व अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या भोंदू रामगिरी बाबावर कारवाई करा अशी तक्रार आज पोलीस स्टेशन आर्णी येथे समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने दाखल करण्यात आली. काहीही कारण नसताना फक्त महाराष्ट्रात धार्मिक क्लेश वाढवून जातीय दंगल व्हावी या उद्देशातून सदर वक्तव्य करण्यात आलेले असून हे वक्तव्य मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे. सणासुदीच्या काळात तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करणाऱ्या रामगिरी विरोधात यावेळी रोष व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्रातील जातीय सलोखा बिघडवणाऱ्या या महाराजांवर कारवाई होणे अत्यंत गरजेचे असून असे न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून सदर वक्तव्याची गंभीर दखल घेत संबंधितावर गुन्हे दाखल करावे व त्याला अटक करावी यासाठी मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाज बांधव आर्णी पोलीस स्टेशनला जमा झाले होते. यावेळी एडवोकेट जावेद शेख, एडवोकेट इरफान चव्हाण,एडवोकेट शाहरुख काझी,फारूक धारीवाला, रियाज सय्यद, रफिक सरकार, राजिक कुरैशी,अली खान, आरिफ खान, सुलतान शेख, अल्ताफ कुरेशी, आरिफ शेख, अन्सार शेख, सुफी रिजवान, सैयद अयुब,आसिफ चव्हाण, साबीर शेख व इतर मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...