वृध्दाश्रम ऊमरीपठार येथे रक्षा बंधनाचा भारावलेल्या वातावरणात कार्यक्रम संपन्न.
ऊमरी पठार येथिल संत डोला महाराज वृध्दाश्रमात रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा झाला.संस्थापक शेषरावजी डोंगरे हे अध्यक्षस्थानी होते तर संजय दुधे,रेखाताई दुधे हे प्रमुख पाहुणे ऊपस्थित होते.संचलन जयप्रकाश डोंगरे यांनी केले.दोनशे वृध्द बांधव व महीला ऊपस्थित होते.या प्रसंगी मारोती डोंगरे,कांताबाई डोंगरे,श्रीकांत डोंगरे,राजशेखर डोंगरे लक्ष्मी जयप्रकाश डोंगरे स्वाती डोंगरेप्पप्रीतीताई डोंगरे,वंदना रुढे,शोभाबाई शेरे संपुर्ण डोंगरे परिवार वृध्दांचे सांत्वनासाठी ऊपस्थित होता.निलेश पुनसे,हर्षल खांदवे,यांची ऊपस्थीती होती.रेखाताई दुधे व डोंगरे परिवारांचे महीलांनी वृध्दांना राखी बांधली.वृध्दाश्रमातील महीलांनाही वृध्दांना व तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष शेषरावजी डोंगरे,अतिथी संजय दुधे, जयप्रकाश डोंगरे यांना राख्या बांधल्यात.या प्रसंगी वृध्दाश्रमाचे वातावरण भारावुन गेले होते.सख्खू बहीण भाऊ दुरावले असले तरी समाजातील बहीण भावाच्या या नात्याणे निराधार वृध्दांच्या डोळ्यात समुद्र साठविला होता.त्यांचे काळीज भावा बहीणीची आठवण काढीत चिंतामग्न झाले होते.या प्रसंगी मिष्टांनाचे जेवन देवुन आनंद साजरा केला.सर्व मान्यवरांचे जयप्रकाश डोंगरे यांनी आभार मानले.
वृध्दाश्रम ऊमरीपठार येथे रक्षा बंधनाचा भारावलेल्या वातावरणात कार्यक्रम संपन्न.
Bhagirath Raja 24 News.com
0


टिप्पणी पोस्ट करा