स्वयंम व आधार योजनेंतर्गत अर्ज स्विकृतीस मुदतवाढ
यवतमाळ, दि.21: इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत अर्ज स्विकृतीस मुदतवाढ देण्यात आली आहे.
शासनाने मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विना अनुदानित महाविद्यालय, तत्रंनिकेतनमध्ये शासनाने निर्धारित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील निवासी व शिक्षण सुविधेपासून वंचित राहू नये स्वतंत्र वसतिगृह निर्वाह भत्ता योजना लागू करण्यास मान्यता दिली आहे.
तसेच सन २०२४ - २५ या शैक्षणिक वर्षात पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत अर्ज स्विकृतीस मुदतवाढ देण्यात आलेलो आहे. उच्च शिक्षणाचे द्वितीय, तृतीय, चतुर्थ वर्षाकरिता अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दिनांक 30 सप्टेंबर आहे. निवड यादी दि.15 ऑक्टोंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
उच्च शिक्षणाचे प्रथम वर्षाकरिता अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दिनांक 15 ऑक्टोंबर असून निवड यादी दि. 30 ऑक्टोंबर रोजी जाहीर करण्यात येईल. या योजनेचे विहीत कालावधीत अर्ज सादर करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक मंगला मुन यांनी केले आहे.
स्वयंम व आधार योजनेंतर्गत अर्ज स्विकृतीस मुदतवाढ
Bhagirath Raja 24 News.com
0


टिप्पणी पोस्ट करा