कायदेविषयक मदतीसाठी राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणची हेल्पलाईन

कायदेविषयक मदतीसाठी राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणची हेल्पलाईन
यवतमाळ, दि. 21 : बरेचदा सर्वसामान्य नागरीकांना मोफत कायदेविषयक सहाय्याची गरज असते. अशा नागरीकांकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने नालसा हेल्पलाईन क्रंमाक १५१०० सुरु करण्यात आला आहे. कायदेविषयक सहाय्याची गरज असलेल्या नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नालसा हेल्पलाईन क्रमांकावरून नागरिकांना घर बसल्या मोफत कायदेशीर सल्ला मिळू शकतो. हुंडा, कौटुंबिक कलह, तलाक, घरगुती हिंसाचार आणि देखभाल, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ, स्त्रियांच्या विनम्रतेचा अपमान करण्याच्या हेतूने केलेले शब्द, कार्य, हालचाली, स्त्रियांचे असभ्य प्रतिनिधीत्व, जमीन विवाद, भाडे व भाडेपट्टी, मालमत्ता आणि वारसा हक्क, समान कामासाठी समान वेतन, किमान वेतन, मातृत्व लाभ, गर्भधारणेचे वैद्यकीय निरस्तीकरण, गर्भधारणापुर्व आणि नंतरच्या सोयींचा गैरवापर प्रतिबंधित करणे, लैगिंक अत्यारापासून मुलांचे संरक्षण, बाल कामगार, वेठबिगारी, शिक्षणाचा हक्क, एफआयआर दाखल करणे, अटक, जामीन, अनुसूचित जाती व जमातीवरील बाबींवर कायदेशीर सल्ला हेल्पलाईनद्वारे मिळू शकतो.
नालसा गुगल अँप व नालसा हेल्पलाईन क्रमांक १५१०० द्वारे तज्ञ पॅनल वकीलांची चर्चा करून, मोफत कायदेविषयक सल्ला तसेच मोफत विधी सेवा मिळवू शकतात. महिला, १८ वर्षाखालील मुले, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तस्करीचे बळी, दारिद्रयरेषेखालील नागरिक, असंघटीत क्षेत्रातील कामगार, नैसर्गिक आपत्तीचे बळी, मानसिक रूग्ण आणि दिव्यांग व इतर सर्वसामान्य वर्गाला कायदेशीर सेवा प्राधिकरण कायदा १९८७ च्या कलम १२ अंतर्गत मोफत कायदेशीर सहाय्य मिळू शकते. कायदेविषयक मदत आवश्यक असल्यास नालसा हेल्पलाईन क्रंमाक १५१०० वर संपर्क साधावा, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिवांनी कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...