वसतिगृह प्रवेश व स्वयंम योजनेसाठी अर्ज आमंत्रित

वसतिगृह प्रवेश व स्वयंम योजनेसाठी अर्ज आमंत्रित
यवतमाळ, दि.27 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाच्यावतीने प्रकल्प क्षेत्रातील वसतिगृहांमध्ये प्रवेश व पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वसतीगृह प्रवेशासाठी जुने व नवीन विद्यार्थी तसेच पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेकरीता जुने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. जिल्हास्तरावरील वसतीगृहांमध्ये महाविद्यालयीन अभ्यासक्रमाकरीता आणि तालुकास्तरीय वसतीगृहामध्ये महाविद्यालयीन अभ्यासक्रमाकरीता दि.३१ ऑगष्ट पर्यंत https://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावरील वसतीगृहात ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार नाही, अशा विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेकरीता वळती करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी वसतीगृह करीता ऑनलाईन अर्ज सादर करतांना पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा चेक बॉक्स क्लिक करून निवड करणे अनिवार्य आहे.
परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांपर्यत संकेतस्थळावर आपला युजरआयडी आणि पासवर्ड तयार करून ऑनलाईन अर्ज न्यू हा पर्याय निवडून भरावा. अर्जासोबत विद्यार्थ्यांनी शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, सन २०२३-२४ चा पालकाचा उत्पन्नाचा दाखला, महाविद्यालयात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, आधार कार्ड, शासकीय वैद्यकीय रूग्णालयाचे प्रमाणपत्र, कॅप राऊंडमध्ये निवड झाल्याची छायाकिंत प्रत, पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुकची छायाकिंत प्रत, इयता १० वी ची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, शिक्षणात खंड असल्यास दाखला इत्यादी प्रमाणपत्र अर्जासोबत ऑनलाईन अपलोड करुन सदर अर्जाची हार्ड कॉपी संबंधित वसतीगृहाच्या गृहपालांकडे सादर करावी व सादर केलेल्या अर्जाची पावती घेण्यात यावी. वसतीगृहातील जुन्या विद्यार्थ्यांना सुद्धा ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. जुन्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज रिन्यू हा पर्याय निवडून अर्ज भरावा. जुन्या विद्यार्थ्यांनी निकाल जाहीर झाल्यापासून १५ दिवसाच्या आत महाविद्यालमध्ये प्रवेश घेवून वसतीगृहाचा ऑनलाईन अर्ज वसतीगृह गृहपालाकडे सादर करावा. असे न केल्यास सदर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे, असे समजून त्याच्या जागी नवीन विद्यार्थ्यांस प्रवेश दिला जाईल. स्वयंम योजने करीता रिन्यू संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ मिळण्याकरीता मुळ प्रमाणपत्रसह ऑनलाईन अर्ज अपलोड करणे अनिवार्य आहे. शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, सन २०२३-२४ चा पालकाचा उत्पन्नाचा दाखला, महाविद्यालयात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड, आधार कार्ड, बँक पासबुकची छायांकित पत्र, इयता १० वी ची गुणपत्रिका, विद्यार्थी व पालकाचे स्वयंम घोषणापत्र, शिक्षणात खंड असल्यास खंड असल्याचा दाखला https://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर स्वयंम योजनेच्या टॅबवर क्लिक करुन ऑनलाईन अर्ज करावा, असे प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांनी कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...