*" वनविभागा मध्ये वरिष्ठाच्या आशीर्वादाने मुकुटबन चे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री टी एन साळुंके यांचा दबंग स्टाईल ने भ्रष्टाचार "*
आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झरी -जामणी या हिरवळीने नटलेल्या तालुक्यात वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या कृपेने कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मुकुटबनचे वनपरिक्षेत्र अधिकारी टी एन साळुंके मोठा भ्रष्टाचार करीत असल्याचे माहिती समोर आली आहे .विशेषता मागील दोन वर्षापासून हा भ्रष्टाचार होत असून .मुकुटबन वनपरिक्षेत्रातील वन कर्मचारी यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी करीत असलेल्या भ्रष्टाचाराला कंटाळून मागील मार्च 2024 पासून या कथीत भ्रष्टाचाराला वाचा फोडली आहे. मुकुटबन वनपरिक्षेत्रातील सर्व कर्मचारी यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी टी एन साळुंके हे कशाप्रकारे कोणतेही कामे न करू देता दबाव, टाकून वरिष्ठाची भीती दाखवून खोट्या बनावट प्रमाणकावर सह्या करून घेतात आणि सह्या केल्या नाही तर त्यांच्यावर कसे जाणून-बुजून चुकीचे पत्र काढून त्रास देतात व निलंबन करण्याची भीती दाखवतात याची ईत्तेम भूत माहिती मागील मार्च 2024 पासून आपल्या पत्राद्वारे DFO पांढरकवडा प्रादेशिक यांना वारंवार कळविले परंतु DFOयांनी कर्मचाऱ्यांच्या पत्राचे कोणतेही दखल न घेतल्यामुळे व कर्मचाऱ्याच्या पत्राला *"केराची टोपली" दाखवल्यामुळे वरिष्ठाच्या आशीर्वादाने वनपरिक्षेत्र अधिकारी श्री टी एन साळुंके मुकुटबन यांची "दबंग स्टाईलने" भ्रष्टाचार* चालू आहे की काय असा प्रश्न झरी तालुक्यातील सर्व जनतेला पडला आहे.
वनविभागा मध्ये वरिष्ठाच्या आशीर्वादाने मुकुटबन चे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री टी एन साळुंके यांचा दबंग स्टाईल ने भ्रष्टाचार "
Bhagirath Raja 24 News.com
0


टिप्पणी पोस्ट करा