⚡ ब्रेकिंग News

सकल हिंदू समाजातर्फे ढाणकी शहर कडकडीत बंद !

*सकल हिंदू समाजातर्फे ढाणकी शहर कडकडीत बंद !*
*ढाणकी/ प्रतिनिधी :* अशांत बांगलादेशात अलीकडे मोठ्या प्रमाणात हत्या, हिंसाचार आणि अराजकता माजली आहे. शेकडो लोकांना जीव गमवावा लागला आणि हजारो लोक जखमी झाले. देशातील राजकीय घडामोडी आणि सत्तापरिवर्तन झाल्यानंतर बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समाजावरील अत्याचाराच्या बातम्या समोर येत आहेत या पार्श्वभूमीवर तसेच कलकत्ता येथील डॉक्टर महिला भगिनी देबनाथ यांच्यावर झालेल्या पाषवी अत्याचाराच्या निषेधार्थ, सकल हिंदू समाज ढाणकी तर्फे दिनांक १८ ऑगस्ट रोजी ढाणकी शहर पूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. सकाळी ११ वाजता ढाणकी शहरातील सकल हिंदू बांधवांनी, जुने बस स्टॉप छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येत या घटनाचे निषेध करत ढाणकी कडकडीत बंद ठेवली होती . याप्रसंगी ढाणकी शहराचे नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल, आनंदराव चंद्रे, रोहित वर्मा, महेश पिंपरवार, रमेश गायकवाड,संतोष पुरी, प्रशांत जोशी, संभाजी गोरटकर, यासह शहरातील सर्व हिंदू बांधव व युवा हिंदू बहुसंख्येने हजर होते. शहरातील सर्व व्यापारी बंधूंनी आपापली प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवून कडकडीत बंद ला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या प्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, बिटरगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेम केदार यांचे मार्गदर्शनात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...