⚡ ब्रेकिंग News

संपत्तीच्या पुढे नाते फिके पडले, जमिनीच्या वादातून चुलत भावाचा खून....!

संपत्तीच्या पुढे नाते फिके पडले, जमिनीच्या वादातून चुलत भावाचा खून....!
माहूर तालुक्यातील मौजे रुई येथे भावकीच्या शेतीच्या वादातून मोठ्या भावाने चुलत भावाचा खून केला आहे. जमिनीचा वाद सोडवण्यासाठी पोलीस पाटलांच्या घरी बैठक बोलवण्यात आली होती. मात्र बैठकीत तोडगा न निघाल्याने मोठ्या भावाने मध्यस्थीसमोरच चुलत भावाचा विळ्याने वार करून खून केला आहे. 18 ऑगस्ट सकाळी साडेनऊच्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. परवेज पंटुष देशमुख (वय 21 वर्षे) असे मृतकाचे नाव आहे. या घटनेचा अधिक तपास एपीआय गायकवाड करत आहेत.
•माझी अडीच एकर जमीन द्या या बैठकीत शेतीसंबंधीच्या वादावर चर्चा चालू झाली. त्यामध्ये पुतण्या साहील बबलू देशमुख हा म्हणाला की, आमची जमीन कोठे आहे आम्हाला तुम्ही अडीच एकर जमीन द्या. त्यावेळी पंटुष देशमुख यांनी बबलू देशमुख याला सांगितले की, तुमची जमीन तुमचे वडील बबलू देशमुख यांनी पूर्वीच विकली आहे. तर बैठकीला हजर असलेल्या इतरांनी जमिनीवरून वाद करू नका, असे आवाहन केले.
•पाठीमागून पकडून विळ्याने वार बैठक संपल्यानंतर सर्वजण घरी जात होते. पण त्याच वेळी साहील बबलू देशमुख याने परवेज यास पाठीमागून पकडले. साहीलने लोखंडी विळा घेतला आणि परवेजच्या छातीवर वार केले. या घटनेनंतर साहील बबलू देशमुख, सोहेब बबली देशमुख हे पळून गेले. छातीवर वार झाल्यानंतर परवेज चांगलेच जखमी झाली. त्यांना तत्काळ माहूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना पुढील उपचाराकरीता दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. परवेज यांना पुसद येथील मेडीकेअर हॉस्पीटल येथे नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी तपासणी करून परवेज यांना मृत घोषित केले. दरम्यान, याबाबत माहूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध घेत आहेत..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...