पिकांवरील विविध कीड आणि रोग नियंत्रण उपाययोजना

पिकांवरील विविध कीड आणि रोग नियंत्रण उपाययोजना
यवतमाळ, दि.21 : सद्या शेतकऱ्यांच्या शेतात विविध पिकांची लागवड झाली असून पिक वाढीच्या अवस्थेत आहे. अशा अवस्थेत पिकांवर विविध किडी व रोग पसरण्याची शक्यता असते. त्यासाठी कृषि विभागाने उपाययोजना सूचविल्या असून त्याप्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. भात पिकावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायसायक्लॅझोल ७५ टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी १० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी, नाचणी पिकात करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड २.५ ग्रॅम किंवा झायनेब ४ ग्रॅम प्रती १ लिटर पाण्यात मिसळून फवारणी, सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्याच्या नियंत्रणासाठी क्लोरॅन्ट्रानीलीप्रोल १८.५ टक्के ३ मिली आणि खोडमाशीच्या नियंत्रणासाठी इंडोक्सीकार्ब १५.८ टक्के एससी ७ मिली क्लोरॅन्ट्रानीलीप्रोल १८.५ एससी ३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मका पिकावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी निमअर्क १५०० पीपीएम किंवा निंबोळी अर्क ५ टक्के ५ मिली किंवा थायोमिथोक्झाम १२.६ टक्के अधिक लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेडसी २.५ मीली प्रती लीटर पाण्यात किंवा क्लोरॅन्ट्रानीलीप्रोल १८.५ एससी, ३ मीली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावे. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅसिटामेप्रिड 20 टक्के 2 ग्रॅम प्रति 10 लिटर किंवा फ्लोनिकॅमिड ५० टक्के ६० ग्रॅम प्रति एकर पाण्यात मिसळून फवारणी तसेच कापूस पिकात आकस्मिक मर रोग आढळून आल्यास झाडाच्या मुळाशी, कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्लूपी २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम ५० डब्लूपी २ ग्रॅम अधिक युरिया १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी. ज्वारी पिकावर खोडमाशीच्या नियंत्रणासाठी २५ टक्के प्रवाही क्विनालफॉस १५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. बाजरी व खरीप ज्वारी पिकावरील मिज माशीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० टक्के ईसी १० मिली किंवा मॅलेथिऑन ५० टक्के ईसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावे. मूग व उडीद पिकात मावा किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा डायमिथोएट १५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी तसेच मुग व उडीद पिकावरील भुरी रोग नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक ८० डब्ल्यू.पी. २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात किंवा कार्बेन्डॅझिम ५० टक्के डब्ल्यू.पी. १० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमुग पिकावर टिक्का आणि तांबेरा या रोगांच्या नियंत्रणासाठी फ्ल्यूबेनडामाईड ३.५ टक्के अधिक हेक्झाकोनॅझोल ५ टक्के डब्ल्यू. जी. २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तूर पिकावरील मर रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम अधिक युरीया २०० ग्रॅम अधिक पांढरा पोटॅश १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात घेऊन हे द्रावण झाडाच्या मूळाजवळ प्रति झाड १०० मिली पावसाची उघडीप पाहून द्यावे, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे. 000

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...