माहूर तालुक्यात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॉक रोगाचा प्रादुर्भाव..!
तालुक्यातील कृषी सहाय्यकांकडून मार्गदर्शनाची अपेक्षा..
माहूर:
खरिपातील नगदी पीक समजल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकावर शेवटच्या टप्प्यात पिवळ्या मोझॅक (हळद्या) या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादनात आणखी घट होण्याच्या भीतीने माहूर तालुक्यांतील शेतकरी चिंतेत आहेत. सध्या बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या दृष्टीने मातीमोल भावाने विकला जाणारा सोयाबीन शेतात मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेचे कारण बनले आहे.
राज्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाने हवालदिल झेलेला आहे त्यातच माहूर तालुक्यात सोयाबीन पिकावर विषाणूजन्य पिवळा मोझॉक रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. सोयाबीन पिकाच्या भाव वाढीसाठी शेतकरी संघटना अनेक दिवसापासून आंदोलने करीत आहे, मगच्या वर्षीचा हमीभाव पाहता यंदा तालुक्यात सोयाबीन पेरणीत लक्षणीय घट आलेली आहे. हमीभाव, विक्रीसाठी येणाऱ्या अडचणी, पिकविम्यातिल कडक अटी आणि दरवर्षी येणारे रोग याला कारणीभूत ठरू शकतात.
सध्या सोयाबिन पिकावर विषाणूजन्य पिवळा मोझॉकरोग आढळून आलेला आहे, या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः पांढऱ्या माशीमुळे होत असतो यामुळे सोयाबिन पिकाचे मोठे नुकसान होऊ शकतात. फुलेरा अवस्थेत याचे संक्रमण झाल्यास पिकाचे ९० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते, पेरणीच्या ७५ दिवसांपर्यंत याची लागण झाल्यास उत्पादनात अधिक घट होऊ शकते अशी महिती तजज्ञांमार्फत मिळालेली आहे.
प्रतिक्रया
शेतकरी बांधवांनी या रोगाच्या नियंत्रणासाठी खालील उपाययोजना करणे आवश्यक आहे.
रोगवाहक किडीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्टरी २५ पिवळे चिकट सापळे लावावे . निंबोळी अर्क 5 टक्के ची फवारणी .
रासायनिक नियंत्रणकरीता ( प्रति १० लिटर पाणी)
अॉसिटामिप्रीड (२५ टक्के) अधिक बायफेन्थ्रीन (२५ टक्के डब्ल्यूजी) (संयुक्त कीटकनाशक) ५ ग्रॅम. (लेबलक्लेम शिफारस आहे).
नितीन रीठे
प्रसिध्द कृषी तज्ज्ञ माहूर
प्रतिक्रिया
या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः पांढऱ्या माशीमार्फत होतो. एखाद्या झाडाला संक्रमण आढळून आल्यास त्वरित ते झाड उपटून धुऱ्यावर न फेकता दुसऱ्या ठिकाणी नेवून नष्ट करावे.
बी बी मुंडे
तालुका कृषी अधिकारी माहूर
माहूर तालुक्यात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॉक रोगाचा प्रादुर्भाव..!
Bhagirath Raja 24 News.com
0




टिप्पणी पोस्ट करा