पोळा कृषी उत्सव 2024
स्पर्धेचे आयोजन
जवळा:शेतकऱ्याचा खरा मित्र हा बैल आहे. या वृषभ देवाच्या कार्याचे उत्तराई होण्याच्या दृष्टिकोनातून बैलपोळा सर्वदूर साजरा केला जातो. या कार्याला आणखीन बहारदार पण आणण्याच्या दृष्टिकोनातून पोळा कृषी उत्सव 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे
स्वर्गीय भारत सिंह ठाकुर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय जवळा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळच्या वतीने पोळा
कृषी उत्सव 2024 स्पर्धेमध्ये उत्कृष्ट बैल जोडी सजावट करिता प्रथम बक्षीस रुपये 1000 स्मुती चिन्ह भारतसिंह ठाकूर स्मृती प्रित्यर्थ प्रथम बक्षीस देण्यात येणार आहे.
तर उत्कृष्ट बैल जोडी देखभाल करिता प्रथम बक्षीस रुपये 1000 स्मृती चिन्ह स्व .कृषी भूषण मधुकर अण्णा दुद्दुलवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रदान करण्यात येणार आहे.
सदर स्पर्धे करता जवळा गावातील तोरणा खाली येणाऱ्या सर्व जोडीचा समावेश असणार आहे .
या स्पर्धेकरिता प्रफुल कारमोरे योगेश तडसे आदिवासी सेवक गोविंदराव भिसे प्रा
ज्योतीपाल देशपांडे आणिस सोलंकी पुरुषोत्तम ठाकरे
खुशाल पडोळे महादेव सुपारे
परिश्रम घेत आहे. तोरणा खाली येणाऱ्या सर्व बैल जोडी मालकांनी आपल्या बैल जोड्या स्पर्धेकरच्या या पद्धतीने तयार करून आणाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे
पोळा कृषी उत्सव 2024 स्पर्धेचे आयोजन
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा