शाळा व्यवस्थापण समितीच्या लेखी आश्वासनाने पालकांचा संप माघे

शाळा व्यवस्थापण समितीच्या लेखी आश्वासनाने पालकांचा संप माघे
सोमवार पर्यंत त्या रस्त्याच्या कामाची करणार दुरुस्ती पालकांच्या आंदोलनाला आले यश नगरपालिका प्रशासनाने १०० मीटर मुरुम टाकण्याचे निघाले टेंडर आर्णी शहरातील सुप्रसिद्ध नारायणलीला या शाळेत जाणा-या रस्तावरुन पायदळ चालणे ही अवघड झाले होते या रस्त्यावरुन मुलांना शाळेत नेतांना पालक घसरुन पडल्याने किरकोळ जख्मी झाले आहेत तसेच आटोचालक,दुचाकी,सायकल चालक हे कित्तेकदा घसरुन पडल्याने अनेक विद्यार्थाचे या रस्त्यामुळे शैक्षणिक नुकसान झाले यावर पालकांनी या रस्त्याबाबत शाळा व्यवस्थापण समितीला व नगरपरिषद प्रशासनाला वारंमवार सांगुन सुध्दा रस्ता दुरुस्त न झाल्याने शेवटी नारायणलीला शाळेतील विद्यार्थाच्या पालकांनी रस्त्याची डागडुजी न केल्यास शाळाबंद आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा शाळेला लेखी निवेदनातून दिनांक १/८/२०२४ रोजी पालकांनीच दिला होता परंतु नगर परिषद व संस्था चालकाने या निवेदनाची कोणतीही दखल घेतली नाही व शाळेच्या वतीने रस्त्याचे काम सुरू झाले आहे सर्वांनी आप आपल्या मुलांना शाळेत पाठवावे असे संदेश पालकांना पाठवून पालकांची दिशाभूल केली. हे पालकांच्या निदर्शनात येताच आज दिनाक २ ऑगस्ट २०२४ ला सकाळी ७ वाजता संतप्त पालक वर्ग शाळे समोर येऊन शेवटी नाईलाजाने शाळेला कुलूप ठोकले .
त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती व प्रशासन हे खळबळून जागे झाले.यावेळी पालकांनी शाळा व्यवस्थापन समितीला या रस्त्याबाबत जाब विचारत हा रस्ता केव्हा दुरुस्त करणार कि मुलांचा आटोचा अपघात झाल्यावर आपणास जाग येईल, मुलांना चांगले शिक्षण मिळावे हा आमचा दुष्टीकोन आहे. पंरतु एखादा अपघात होऊन कमी जास्त झाले तर पाल्यांचे भविष्य अंधकारमय होईल. आम्ही आपण जी फि आकारणी केली ती तर आम्ही भरली आहे पण या रस्त्यामुळे आमचे पाल्य असुरक्षित जानवत असल्याने सदरचा रस्ता जो पर्यंत काम पुर्ण करणार नाही किंवा तात्पुरती डागडुजी करणार नाही तो पर्यंत आम्ही सर्व पालक विद्यार्थांना शाळेत पाठवणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने शेवटी शाळा व्यवस्थापन समिती व प्रशासन हे खळबळून जागे झाले असून व शाळेच्या वतीने पालकांना दिनाक ५ ऑगष्ठ २०२४ रोजी सोमवार पर्यंत शाळेचा रस्ता दुरुस्त करून देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्या नंतर पालकांनी आपला आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतला आहे यावेळी प्रदीप जाधव,सद्दाम शेख,जाफर शेख,आसिफ शेख,रोशन राठोड,शंकर नाटकर, सुनंदा चव्हाण, शिवानी राऊत, रिजवान कालुक, सादिक शेख, साधना संदीप ठाकरे, स्वाती रवींद्र गावंडे, ओमकार काळे,सोनाली खरे, जयदीप राठोड, उमेश मामेडवार, रचना मामेडवार यांच्या अमोल सावदे, मजहर खान, रिजवान खान, राहुल गिरी,सीमा जाधव, जा ख्वाजा, आकाश सूर्यकार यांच्यासह इतर पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ======बॉक्स===== नगपरिषद प्रशासनाला ही आली जाग खुशाल ठाकरे ते पुला पर्यंत या रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे या रस्त्या बाबत सदर रहिवाशी नागरीकांनी मुरुम व चुरी टाकण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाला विनंती करुन सुध्दा नगरपरिषद प्रशासनाने या कडे गांभिर्याने दुर्लक्ष केले शेवटी नारायणलीला शाळेतील पालकांनीच आंंदोलन केल्याने नगरपरिषद प्रशासनाला रस्ता दुरुस्त करण्याची जाग आली या रस्त्यावर १०० मीटर मुरुम टाकण्याचे टेन्डर काढण्यात आल्याची माहीती प्राप्त झाली आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...