रामराज्य गणेशोत्सव मंडळ गांधीनगर आर्णी तर्फे नारी शक्ती सेल्फ डिफेन्स प्रात्यक्षिक

रामराज्य गणेशोत्सव मंडळ गांधीनगर आर्णी तर्फे नारी शक्ती सेल्फ डिफेन्स प्रात्यक्षिक
दिनांक 13 सप्टेंबर शुक्रवार रोजी रामराज्य गणेशोत्सव मंडळ गांधीनगर आर्णी तर्फे नारी शक्ती सेल्फ डिफेन्स प्रात्यक्षिक चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व बाप्पाच्या मूर्तीला हार अर्पण करुन करण्यात आली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्रीमती विजया ताई पंधरे ( पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा कोतवाली अमरावती शहर ) व प्रमुख पाहुणे म्हणून श्री केशव ठाकरे साहेब ठाणेदार आर्णी पोलिस स्टेशन व मर्दानी असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे क्रीडापटू तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यवतमाळ जिल्हा महाविद्यालयीन प्रमुख प्रीतम दादा सोनवणे हे मार्गदर्शक म्हणून मंचावर उपस्थित होते. श्रीमती विजया ताई पंधरे ( पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा कोतवाली अमरावती शहर ) यांनी मुलींना महिलांना आत्मरक्षा व लैंगिक कायद्याविषयी माहिती विविध प्रकारच्या उदाहरण द्वारे समजाऊन सांगितली. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आर्णीचे ठाणेदार ठाकरे साहेबांनी तुम्ही केव्हा पन मला मदती साठी आवाज द्या मी नेहमी तत्परतेने तयार आहे अशा प्रकारे मुलींना व त्यांचा पालकांना कोणताही प्रकार घडल्यास सामाजिक बदनामी ल न घाबरता आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला नक्की मदत करू असा विश्वास दिला. तर मार्गदर्शक प्रीतम दादा सोनवणे यांनी मुलींना शक्तिशाली बना व्यायाम करा आणि स्वरक्षणा साठी तयार व्हा असा संदेश दिला. दुर्गा वाहिनी आर्णी प्रखंड च्या कार्यकर्ती नी सिंगल स्टिक डब्बल स्टिक रोटेशन व शाळेत जाणाऱ्या एका शाळकरी मुलीला चिडमार करण्याऱ्या टवाळखोर मुलांपासून स्वतःचे स्वसंरक्षण कसं करावं याचे प्रात्यक्षिक सादर केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविक प्राजक्ता नखाते , परिचय राणी आडे व आभार वैष्णवी चौधरी यांनी केले. विजया ताईच्या हस्ते आरती करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...