हिंदी भाषा दिवस साजरा
स्व. भारत सिंह ठाकूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जवळा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ च्या वतीने राष्ट्रीय हिंदी दिनाच्या आयोजन करण्यात आले होते
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित या उपक्रमांमध्ये हिंदी ही राष्ट्रभाषा कशी झाली याविषयीचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला गेला.
सोबतच आपला देश विविध भाषेंनी नटलेला आहे. यामध्ये एक सर्व राज्या मध्ये संपर्क करण्यासाठी एक राष्ट्रीय भाषा असावी या दृष्टिकोनातून हिंदी भाषेला मान्यता दिलेली आहे.
आपल्या देशातील अधिकांश नागरिक हिंदी भाषा संपर्कासाठी उपयोगात आणतात या कारणे आपण जास्तीत जास्त व्यवहार हिंदी भाषे मधून केले पाहिजे असेही मत यावेळेस मान्यवरांनी व्यक्त केले.
या आयोजित कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा चर्चेतून आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. पुरुषोत्तम गावंडे प्रा.आणिस सोलंकी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकांने प्राचार्य डॉ.विलास राऊत यांच्या मार्गदर्शनात केले हे विशेष
हिंदी भाषा दिवस साजरा
Bhagirath Raja 24 News.com
0


टिप्पणी पोस्ट करा