*वृक्षमित्र संजय काळे यांचा सत्कार*
400 वृक्षांची केली लागवड
आर्णी.
स्व. भारतसिह ठाकूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जवळा च्या वतीने वृक्षमित्र संजय काळे यांनी केलेल्या चारशे वृक्षांच्या वृक्षारोपणासाठी नुकताच 15 तारखेला रविवारी सत्कार आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथका अंतर्गत दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोज रविवारी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार गणेश धनोडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शेरो सय्यद आणि रझाक शेख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये डॉक्टर अनंत सिंह ठाकुर यांनी वृक्षाचे महत्त्व विशद केले.
तर सत्काराला उत्तर देता वेळेस संजय काळे यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले. त्यांनी वृक्षारोपण समितीची स्थापना करून समाज सहभागातून चारशे वृक्षांची यवतमाळ येथील भोयर बायपास रोडवर लागवड केली. या लागवड केलेल्या वृक्षांमध्ये तीन वर्षापेक्षा अधिक वयाची वृक्ष लावल्या गेली. कडुलिंब वड आणि पिंपळ याप्रमाणे दीर्घ काळ जगणाऱ्या वृक्षांची लागवड केल्या गेल्याने आपण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि हा प्रयत्न अल्पसा आहे असे त्यांनी भाषणातून सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना गणेश धनोडे यांनी संजय काळे यांच्या कार्याचे कौतुक करत महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची स्तुती केली.
या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील कार्यक्रमाधिकारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
वृक्षमित्र संजय काळे यांचा सत्कार* 400 वृक्षांची केली लागवड
Bhagirath Raja 24 News.com
0


टिप्पणी पोस्ट करा