अखेर जिल्हा प्रशासनाचे शेतकरी पुत्रांना बैठकीचे निमंत्रण; जिल्हा प्रशासनासोबत १९ सप्टेंबरला शेतकरी प्रश्नी बैठक;खा.संजय देशमुख व काँग्रेस नेते माणिकरावजी ठाकरे यांची मध्यस्थी...
शेतकरी पुत्रांचे अन्नत्याग आंदोलन तूर्त स्थगित ;खा.संजय देशमुखांच्या हस्ते सोडले उपोषण...
उद्याचे आंदोलन तूर्त स्थगित; १९ सप्टेंबरच्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास २० सप्टेंबर पासून आक्रमकपणे रस्त्यावर उतरणार - प्रा.पंढरी पाठे
यवतमाळ,:- सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा,अतिवृष्टीची १००% नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांपासून सरंक्षणासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी पुत्र सचिन मनवर,कृष्णा पुसनाके, व प्रा.पंढरी पाठे यांनी यवतमाळ येथील आझाद मैदानात गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले हॊते. दरम्यान शासनाने या आंदोलनाची दखल घेतली असून जिल्हा प्रशासनाचे उपविभागीय अधिकारी गोपाल देशपांडे यांनी मागण्यासंदर्भात १९ सप्टेंबर रोजी यवतमाळ येथे बैठक बोलावली आहे.मा. जिल्हाधिकारी व संबंधित विभागाचे मंत्री अधिकारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला शेतकरी पुत्र व त्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे.प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी देशपांडे यांनी जिल्हा प्रशासनाच्या बैठकीचे निमंत्रणाचे लेखी पत्र प्रा.पाठे यांना दिले.यवतमाळ-वाशिम जिल्ह्याचे जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख व काँग्रेस नेते माणिकरावजी ठाकरे यांनी या बैठकीसाठी मध्यस्थी केली.शासनाने आंदोलनाची दखल घेऊन शेतकरी पुत्रांना चर्चेसाठी बोलाविले आहे,त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती शेतकरी व सहकाऱ्यांनी केल्यानंतर कृष्णा पुसनाके,सचिन मनवर यांनी आंदोलन स्थळी उपस्थित शेतकऱ्यांच्या हस्ते व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या चरणी नतमस्तक होत आपले अन्नत्याग आंदोलन तूर्त स्थगित केले.बैठकीत काय निर्णय होतो हे पाहून पुढील दिशा ठरवू,जर ठोस निर्णय झाले नाही तर राज्यभर आक्रमकपणे पुन्हा रस्त्यावर उतरू,सचिन मनवर यांनी सांगितले.
यावेळी बाळासाहेब मांगुळकर, रवी ढोक,बबलू देशमुख,प्रा.दरणे,बिपिन चौधरी,ज्ञानेश्वर गायकवाड,राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे,मोहन इंगळे, अनिल गायकवाड,जितेंद्र मोघे, वर्षाताई निकम,शुभम लांडगे, प्रकाश कांबळे,प्रशांत कुटे,प्रा.प्रवीण देशमुख,उपस्थित होते.
कोट -
शेतकऱ्यांच्या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाला तत्काळ सूचना देत आणि समन्वय साधत,आंदोलन सोडवण्यात यश आले.
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सरकारकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल,अशी अपेक्षा व्यक्त करतो.
संजय देशमुख - खा.यवतमाळ-वाशिम,लोकसभा.
अखेर जिल्हा प्रशासनाचे शेतकरी पुत्रांना बैठकीचे निमंत्रण; जिल्हा प्रशासनासोबत १९ सप्टेंबरला शेतकरी प्रश्नी बैठक;खा.संजय देशमुख व काँग्रेस नेते माणिकरावजी ठाकरे यांची मध्यस्थी...
Bhagirath Raja 24 News.com
0





टिप्पणी पोस्ट करा