जवाब दो आंदोलनाला कामगाराचा प्रचंड प्रतिसाद मात्र शेकलगावच्या ग्रामसेवकाची दांडी

जवाब दो आंदोलनाला कामगाराचा प्रचंड प्रतिसाद मात्र शेकलगावच्या ग्रामसेवकाची दांडी
वार्ताहर - तेजस किरणापुरे शेकलगाव महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वतीने कामगारासाठी अतिशय चांगल्या योजना असून त्यासाठी कामगार कार्ड आवश्यक आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांनी सदर ९० दिवसाच्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक यांनाच सह्या करण्याचे अधिकार असल्याने ग्रामसेवकांनी 90 दिवसाचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात पत्र दिले होते.
परंतु सदर शासन निर्णय तथा जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्राला न जुमानता आर्णी घाटंजी केळापूर विधानसभेतील ग्रामसेवकांनी सदर कामगारांना प्रमाणपत्र देण्यास नकार दिलेला असून ते 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर सह्या करत नाही. त्यामुळे अनेक कामगारांना लाभापासून वंचित रहावे लागते. या विरोधात डॉ विष्णू उकंडे यांच्या नेतृत्वात आर्णी घाटंजी केळापूर येथील ग्रामपंचायत वर कामगारांचे 'जवाब दो' आंदोलन चालू आहे. काल आर्णी तालुक्यातील शेकलगाव या गावी डॉ. विष्णुभाऊ उकंडे यांच्या नेतृत्वात आणि शिवभक्त संघटनेच्या सहकार्याने तसेच शेकलगावचे ग्रामस्थ महिला भगिनी यांच्या सहभागाने सदर शासन निर्णय तथा मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे पत्र देऊन जवाब दो आंदोलनाद्वारे उत्तर मागण्यात आले. यावेळी मात्र शेकलगावच्या ग्रामसेवकाने आंदोलनाच्या दिवशी येणे टाळल्याने ग्रामपंचायतला ग्रामपंचायत सदस्य अंजुम शेख शकुंतला जोगे शिवभक्त संघटनेचे योगेश किरणापूरे, शाहरुख खान, राजू बागडे, सुरेश काळे, दीपक मिटकर, सचिन चिंतावार, शुभम किरणापुरे तसेच शेकलगावच्या महिला भगिनींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. डॉ. विष्णुभाऊ उकंडे यांचा आठ दिवसांचा अल्टीमेटम जवाब दो आंदोलन जवळा,कोपरा, तेंडोळी तसेच शेकलगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन यावेळी त्यांनी आठ दिवसात प्रश्न मार्गी न लावल्यास वेगळी भूमिका घेणार डॉ. विष्णू उकंडे आर्णी केळापुर विधानसभा प्रमुख, बाळासाहेबांची शिवसेना

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...