दारू विक्रेत्यांकडून शासकीय नियमाचे उल्लंघन (सकाळी 6वाजता उघडतात दुकानें )

दारू विक्रेत्यांकडून शासकीय नियमाचे उल्लंघन (सकाळी 6वाजता उघडतात दुकानें )
ढाणकी प्रतिनिधी : दारूच्या नशेत तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. असे असतानाही निव्वळ महसूल मिळतो म्हणून राज्य शासनाकडून स्वत:च्या नियमांनाच पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र ढाणकी या शहरात दिसत आहे . शहरातील देशी-विदेशी दारूची दुकाने सकाळी 8 ते 10 वाजेनंतर उघडण्यात यावीत, असा शासकीय नियम असताना . प्रत्यक्षात मात्र, सकाळी सकाळी 6 वाजता तोच तळीरामांची सोय होताना दिसत आहे. खेड्या भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे याकडे होणारे दुर्लक्ष म्हणा किंवा आर्थिक संबंधांचा परिणाम, सकाळपासूनच शहरात राजरोसपणे दारू विक्री केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. सामान्यांना कायद्याचा धाक दाखवणारे स्थानिक पोलिस मात्र दुर्लक्ष करतानी दिसत आहेत. यामुळे सामान्यांना दारू पिदाड्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ढाणकी येथील मेन गावातील रस्त्यात शाळेत जाणारे मुलं, मुली व सकाळी सकाळी जॉगिंग ला जाणारे जेष्ठ नागरिक, महिला व भक्त यांना परिसरातील देशी-विदेशी दारू विक्री दुकानातून बाहेर पडणार्‍या पिदाड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील परवानाधारक विक्रेते सकाळी 6 वाजेपासून दुकाने उघडत असून, बाहेर गावी अवैध दारू विक्री साठी नेणाऱ्याची आणि त्याच वेळी दारू पिणारे सर्रासपणे दारू विकत घेऊन रस्त्यावरच ते पिताना दिसतात. काही तरुण वर्ग दारु पिऊन रस्त्यावरच धुमाकूळ घालत शिवीगाळ करीत असतात , कुणाच्या दुकानासमोर लगूशंका करत हुजत घालून भानगडी करतात याची तक्रारी नागरिक करताना दिसत आहे.दारू विक्रेते सकाळी 8 ते 10 वाजेपूर्वीच दुकाने उघडतात, त्यांच्यावर कोणत्या स्वरूपाची कारवाई केली जाणार की नाही?दारू विक्रेत्यांकडून शासकीय नियमाचे उल्लंघन होत असल्यास दारूबंदी कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल का?असे प्रश्न नागरिक करत आहे.
चौकट दारू विक्रेत्यांकडून शासकीय नियमाचे उल्लंघन होत असल्याचे पत्र राज्य उत्पादन सुल्क यांना देऊन अवैध दारू विक्री वर आळा घालण्यात येईल. बिटरगाव ठाणेदार प्रेम केदार
चौकट देशी-विदेशी दारूची दुकाने सकाळी 8 ते 10 वाजेनंतर उघडली पाहिजे जर कोणी विक्रेता शासकीय नियम डावलून दुकान या आधी उगडत असेल तर त्यावर दारूबंदी कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. राज्य उत्पादन शुल्क अधिकारी अनिल पिकाळे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...